औरंगाबादेत मध्यरात्री राजीव गांधी मार्केटच्या मागील कचरा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:17 AM2018-04-26T02:17:35+5:302018-04-26T02:20:41+5:30
मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.
औरंगाबाद : मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.
२०१२ साली हे मार्केट आगीमध्ये जळून खाक झाले होते. त्यामुळे आगीचे वृत्त्त समजताच दुकानदार, नातेवाईक आणि मित्र परिवाराने तातडीने मार्केटकडे धाव घेत दुकाने उघडून सर्व काही सुरक्षित असल्याचे पाहून सुटकेचा नि:श्वास टाकला. दुकानदार रमेश घोडके यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी मार्केटच्या मागील कचरा कुणीतरी अज्ञाताने पेटविला होता. दुकाने बंद करण्यापूर्वी तो कचरा विझविण्यात आला होता.
परंतु, रात्री एकच्या सुमारास अचानक मोठ्या आगीचे लोट उठले. आगीने गुलमोहर आणि बाभळीचे ओले झाड अर्धे जळाले. शिवाय मार्केटमधून बुट, चप्पल बनवून उरलेला कचरा भिंतीलगत टाकलेला होता, तोही पेटला. आग लागल्याचे पाहून काही दुकानदार तेथे आले, परंतु काय करावे हे त्यांना सुचले नाही.
‘लोकमत’ प्रतिनिधीने फायरब्रिगे्रडला संपर्क करून तातडीने बंब बोलावून घेतला. मध्यरात्री १२.५३ वाजता फायरब्रिगेडला फोन केल्यानंतर १ वाजून ७ मिनिटाला तेथे बंब व फायरचे जवान दाखल झाले. त्यांनी अर्धा ते पाऊण तास परिश्रम घेत कचºयाची आग विझविली. तोपर्यंत दुकानदार आणि नातेवाईकांनी मार्केट परिसरात मोठी गर्दी केली होती. नगरसेवक मनोज गांगवे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने यांनी फायरब्रिगे्रडच्या जवानांना मदत केली.
एक दुकान उघडले म्हणून...
घोडके यांच्या दुकानाच्या पाठीमागेच आग लागली होती. त्यांचे दुकान उघडे होते म्हणून फायरब्रिगे्रडला मदत कार्य करण्यास अडथळे आले नाहीत. उपविभागीय कार्यालय, एमआयडीसीच्या गेस्ट हाऊस मागून फायरबंब जाणे शक्य नव्हते. जालना रोडवरच फायरबंब उभा करून आग विझविण्याचे प्रयत्न झाले.