विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:04 AM2017-11-18T01:04:01+5:302017-11-18T01:04:14+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित विभागीय सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.
औरंगाबाद : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित विभागीय सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.
१४ वर्षांखालील मुले (टाइम ट्रायल) : १. कुणाल लखवाल (गुरुदेव संमतभद्र विद्यालय, वेरूळ), २. साई अंबे (चाटे स्कूल), ३. भारत सोनवणे (औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल). मास्टर स्टार्ट : १. अवधूत उकिर्डे (महाराष्ट्र पब्लिक स्कूल), २. नकुल पालकर (स.भु., औरंगाबाद), ३. अभिजित लखवाल (गुरुदेव संमतभद्र विद्यालय, वेरूळ).
१४ वर्षांखालील मुली (टाइम ट्रायल) : १. साक्षी जाधव, २. योगिता मुळे (गुरुदेव संमतभद्र वि., वेरूळ), ३. फातिमा शेख (मोईन उल उलूम), मास्टार स्टार्ट : १. दानिया सोहेल, २. सानिया खान, ३. सईदा कादरी (मोईन उल उलूम).
१७ वर्षांखालील मुले (मास्टार स्टार्ट) : १. सूरज जाधव (स.भु. हायस्कूल), २. अतिष मोरे (ज्ञानेश विद्यामंदिर, औरंगाबाद), ३. हर्षल राऊत (देवगिरी ग्लोबल हायस्कूल, औरंगाबाद). टाइम ट्रायल : १. अमोल जंगले (गुरू समंतभद्र विद्यालय, वेरूळ), २. अनिष शुक्ला (बी.एस.जी.एम.), ३. ओम गाडेकर (एस.बी.ओ.ए.).
मुली (टाइम ट्रायल) : १. पूजा अंबे (चाटे स्कूल), २. ऋतुजा पाठक (शारदा कन्या वि.), ३. खुतेज समरीन (मोईन उल उलूम). मास्टर स्टार्ट : १. निकिता जंगाळे, २. करिना चव्हाण (गुरुदेव संमत भद्र वि., वेरूळ), ३. सविता जाधव (मोईन उल उलूम).
१९ वर्षांखालील मुले (टाइम ट्रायल) : १. श्रेयस निरवळ (जालना), २. अनिकेत पेरकर (स्प्रिंगडेल महा.), ३. प्रणव जोशी (देवगिरी महा.). मास्टर स्टार्ट : १. अमोल लखनवाल (घृष्णेश्वर महा.), २. सतीश मोरे (मेहेरसिंग नाईक), ३. संतोष गिरी (एस.एन.डी. महा.).
मुली (टाइम ट्रायल) : १. श्राव्या यादव, २. सरिता सरदार (स्प्रिंगडेल महा.), ३. अश्विनी शिंदे. मास्टर स्टार्ट : १. नंदिनी पवार, २. आम्रपाली बागूल, ३. प्रियंका राऊत.
या स्पर्धेतील विजेते सांगली येथील राज्यस्तरीय स्पर्धेत औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय व्यवहारे, चरणजितसिंग संघा, अजय गाडेकर, शशिकांत सोनवणे, सचिंद्र शुक्ला, विजय सरोदे, उत्तम चव्हाण, भाऊसाहेब मोरे, जगदीश संघा, ऋषिकेश पटकुळे, यादव पेरकर, भिकन अंबे, युवराज राठाड, संतोष अवचार, दिनेश जायभाये, गोकुळ तांदळे यांनी काम पाहिले.