महाराष्ट्र हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:01 AM2018-03-15T01:01:39+5:302018-03-15T01:01:59+5:30
भोपाळ येथे हॉकी इंडियातर्फे २६ एप्रिल ते ६ मे दरम्यान ज्युनिअर मुलांच्या व मुलींच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र हॉकी संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबादचे आमीद खान पठाण, सत्यम निकम, प्रणय तांबे, प्रेमराज धनवे, योगेश सभादिंडे, अनिता शर्मा, पूनम वाणी, श्रुती विधाते, आरती देहाडे यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद : भोपाळ येथे हॉकी इंडियातर्फे २६ एप्रिल ते ६ मे दरम्यान ज्युनिअर मुलांच्या व मुलींच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र हॉकी संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबादचे आमीद खान पठाण, सत्यम निकम, प्रणय तांबे, प्रेमराज धनवे, योगेश सभादिंडे, अनिता शर्मा, पूनम वाणी, श्रुती विधाते, आरती देहाडे यांची निवड करण्यात आली आहे. हे महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी पुणे येथे नुकतेच रवाना झाले आहेत. रवाना झालेल्या खेळाडूंना जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, माजी महापौर अशोक सायन्ना, डॅनियल फर्नांडिस, कमांडर विनोद नरवडे, प्रदीप खांड्रे, शेख साजिद, शामसुंदर भालेराव, संजय तोटावाड, समीर शेख, सुयश पंडागळे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.