राज्य हॉकी निवड चाचणीसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:07 AM2019-01-29T00:07:17+5:302019-01-29T00:07:39+5:30

पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू निवड चाचणीसाठी पुणे येथे नुकतेच रवाना झाले आहेत.

Aurangabad players leave for state hockey selection test | राज्य हॉकी निवड चाचणीसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना

राज्य हॉकी निवड चाचणीसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना

googlenewsNext

औरंगाबाद : पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू निवड चाचणीसाठी पुणे येथे नुकतेच रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औरंगाबादचा राष्ट्रीय खेळाडू सत्यम निकम याची महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. या खेळाडूंना जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्रचे उपायक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष अशोक सायन्ना, कमांडर विनोद नरवडे, दिनेश गंगवाल, प्रदीप खांड्रे, शेख साजीद, श्यामसुंदर भालेराव, सय्यद आझम यांनी राज्य निवड चाचणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Aurangabad players leave for state hockey selection test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.