औरंगाबाद रेल्वे स्कॉडला डॉगची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:06 AM2018-06-30T00:06:03+5:302018-06-30T00:07:42+5:30
राजेश भिसे । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : रेल्वे पोलिसांच्या डॉग स्कॉडमध्ये असलेला ‘सॅण्डी’ तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाला; पण ...
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेपोलिसांच्या डॉग स्कॉडमध्ये असलेला ‘सॅण्डी’ तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाला; पण त्याच्या जागेवर दुसरा डॉग अद्याप रेल्वे पोलीस दलास मिळालेला नाही, त्यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वेतील संशयास्पद हालचाली वा संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी शहर पोलिसांच्या डॉग स्कॉडवर भिस्त आहे.
औरंगाबाद रेल्वे पोलीस दलासाठी एक डॉग स्कॉड कार्यरत होते. यात ‘स्निपर सॅण्डी’ हा डॉग आणि दोन हॅण्डलर कार्यरत होते. गुडस् टर्मिनल, यार्ड, टू व्हिलर, फोर व्हिलर पार्किंग, तिकीट खिडकी, स्थानक, रेल्वे डबे आणि संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी हे स्कॉड काम करीत होते. आयुर्मानानुसार दर दहा वर्षांनी स्कॉडमधील डॉग सेवानिवृत्त होतो. त्याप्रमाणे तीन महिन्यांपूर्वी ‘सॅण्डी’ सेवानिवृत्त झाला. त्याला परंपरेप्रमाणे रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. नव्या पाहुण्याच्या आगमनाची प्रतीक्षा रेल्वे पोलिसांना लागून राहिली. काही दिवस प्रतीक्षा केल्यानंतर रेल्वे पोलीस मुख्यालयाशी पत्रव्यवहार व पाठपुरावाही करण्यात आला; पण अद्याप या प्रयत्नांना यश मिळाले नसल्याचे दिसून येते. डॉग स्कॉडमध्ये एक डॉग आणि दोन कॉन्स्टेबल हॅण्डलर म्हणून कार्यरत होते. सॅण्डी सेवानिवृत्त झाल्यानंतर एका हॅण्डलरची बदली करण्यात आली, तर दुसºयास इतर विभागातील काम देण्यात आले. सध्या शहर पोलिसांच्या डॉग स्कॉडवरच रेल्वे पोलिसांची भिस्त असून, रेल्वे पोलीस मुख्यालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांनी स्कॉडसाठी डॉग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
दोन डॉग स्कॉडची गरज
औरंगाबद रेल्वेस्थानक तसे संवेदनशील स्थानक म्हणून ओळखले जाते. अनेक लांब पल्ल्यांच्या वा सुपर एक्स्प्रेस रेल्वेही येथून जातात आणि येतात. प्रवाशांची वर्दळ व इतर संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर येथे रेल्वे पोलिसांना दोन डॉग स्कॉडची गरज आहे. ते मिळाल्यास संभाव्य घातपाताच्या घटना टळू शकतील.
स्कॉडमधील डॉगसाठी विशेष व्यवस्था
४रेल्वे पोलिसांच्या कार्यालयाशेजारीच डॉग स्कॉडसाठी विशेष रूम्स तयार करण्यात आलेल्या आहेत. दोन डॉगसाठी दोन खोल्या आणि हॅण्डलर्ससाठी दोन खोल्या तयार करण्यात आल्या. पैकी एका खोलीत ‘सॅण्डी’ राहत होता. तो निवृत्त झाल्याने ही रूम आणि हॅण्डलर्ससाठीच्या दोन्ही खोल्याही रिक्तच आहेत.