स्वच्छतेत देशात औरंगाबाद रेल्वेस्टेशन ५१५ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:54 PM2019-10-05T22:54:02+5:302019-10-05T22:54:33+5:30
गेल्या वर्षी 'अ' दर्जेच्या यादीत औरंगाबाद रेल्वेस्टेशन ३२१ क्रमांकावर होते.
औरंगाबाद : स्वच्छतेत देशभरातील ६११ स्टेशनमध्ये औरंगाबादरेल्वेस्टेशन ५१५ व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी ह्यअह्ण दर्जेच्या यादीत औरंगाबाद रेल्वेस्टेशन ३२१ क्रमांकावर होते.
दरवर्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे स्टेशनचे थर्ड पार्टी आॅडिट करण्यात येते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत दोन महिन्यांपूर्वीच रेल्वेस्टेशनवर पाहणी करण्यात आली होती. यामध्ये स्टेशनवरील सुविधा, स्वच्छतेबद्दल जनजागृती, प्रवाशांच्या प्रतिक्रिया, स्वच्छतेसाठीचे उपक्रम, नियमित केली जाणारी स्वच्छता आदी निकषांवर मानांकन ठरवण्यात आले.
या पाहणीनंतर स्वच्छतेतील रेल्वेस्टेशनचे ‘रँक’ जाहीर करण्यात आलेले आहे. यात स्वच्छ रेल्वेस्टेशन तपासणीत औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या क्रमांकात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घसरला आहे.
गेल्या वर्षी ‘अ’ दर्जेच्या यादीत औरंगाबाद रेल्वेस्टेशन ३२१ क्रमांकावर होते. यंदा देशभरातील ६११ रेल्वेस्टेशनच्या यादीत औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन ५१५ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.