औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथील बेशिस्त वाहतुकीला लागणार वेसण; दोन स्वतंत्र पोलीस चौक्या होणार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 04:18 PM2018-06-08T16:18:47+5:302018-06-08T16:19:54+5:30
रेल्वेस्टेशन येथील बेशिस्त रिक्षाचालक, विस्कळीत पार्किंग आणि मनमानी हॉकर्संना पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी शिस्तीचा डोस दिला.
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन येथील बेशिस्त रिक्षाचालक, विस्कळीत पार्किंग आणि मनमानी हॉकर्संना गुरुवारी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी शिस्तीचा डोस दिला. यापुढे शिस्त मोडाल तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत त्यांनी स्टेशनवर उस्मानपुरा आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र चौकी सुरू करण्याचे आदेश दिले.
रेल्वेस्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांचा धुमाकू ळ दिसतो. रिक्षाचालक स्टेशनमध्ये घुसून प्रवाशांच्या बॅगा हातात घेऊन त्यांना बळजबरीने रिक्षात बसण्यासाठी आग्रह करतात. मनमानी पद्धतीने भाडे आकारणे, प्रवाशांसोबत वाद घालणे हे नित्याचेच झाले. तेथे दुचाकी आणि चारचाकी वाहन पार्किंगमध्ये बेशिस्तरीत्या वाहने उभी असतात. स्टेशनच्या प्रवेशद्वारावर हॉकर्सने बस्तान मांडल्याने वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त ढाकणे यांनी आज स्टेशनची पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, निरीक्षक मुकुंद देशमुख, अनिल आडे, घोडके उपस्थिती होते.
आयुक्तांकडूनही पाहणी
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजेनंतर अचानक रेल्वेस्टेशनला भेट देऊन पाहणी केली. तेथील विदारक चित्र पाहून त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले.
रिक्षा प्रवासभाड्याचा फलक लावणार
एवढेच नव्हे तर मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारतात. स्टॅण्डवर रांगेत थांबून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हवे त्या ठिकाणी नेऊ न सोडणे रिक्षाचालकाचे कर्तव्य आहे. जास्त पैसे देणाऱ्या प्रवाशालाच ते रिक्षातून नेण्यास तयार होतात. परिणामी, प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजून प्रवास करावा लागतो अथवा विविध रिक्षाचालकांना विनंती क रावी लागते. ही बाब लक्षात घेऊन रिक्षाचा किफातशीर प्रवासभाडे फलक रेल्वेस्टेशनवर लावण्यात येणार आहे.
- विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त