स्टार्टअप्‌ वाढीसाठी औरंगाबादचा क्रमांक जगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:57+5:302021-07-02T04:04:57+5:30

स्टार्टअप्‌च्या वाढीसाठी जगाच्या यादीत औरंगाबादचे नाव झळकले, यामागे मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिलची (मॅजिक) मागील दहा वर्षांची ...

Aurangabad ranks number one in the world for startup growth | स्टार्टअप्‌ वाढीसाठी औरंगाबादचा क्रमांक जगात

स्टार्टअप्‌ वाढीसाठी औरंगाबादचा क्रमांक जगात

googlenewsNext

स्टार्टअप्‌च्या वाढीसाठी जगाच्या यादीत औरंगाबादचे नाव झळकले, यामागे मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिलची (मॅजिक) मागील दहा वर्षांची तपश्चर्या असून ‘मॅजिक’च्या सामूहिक प्रयत्नाचे हे फळ आहे. ‘सीएमआयए’चे ‘मॅजिक’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अशी तीन इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नावीन्यपूर्ण उद्योगाला चालना मिळाली. औरंगाबादेतील स्टार्टअप्‌च्या या लौकिकामुळे नकळत भारत सरकारच्या स्टार्टअप् इंडियाला देखील मोठा पाठिंबा मिळाला आहे.

- प्रकाश कोकीळ, मराठवाडा उपाध्यक्ष, सीआयआय

बातमी जोड.....

जगात पहिल्या हजार शहरांच्या यादीत औरंगाबादचे नाव येण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वीचे परिश्रम आहेत. प्रसाद कोकीळ आणि प्रशांत देशपांडे यांनी ‘सीएमआयए’च्या माध्यमातून सन २०१० मध्ये पहिल्यांदा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट समिट आयोजित करण्यात आली होती. त्यात मुलांना उद्योजकतेला (इंटरप्रिनरशिप) घाबरून न जाता त्याचा आनंद घ्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सन २०१६ पासून ‘मॅजिक’ या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ‘सीएमआयए’चे तत्कालीन अध्यक्ष आशिष गर्दे व कोकीळ यांनी परिश्रम घेतले. ते प्रत्येक नावीन्यपूर्ण प्रयोग, आयडिया जोडत गेले. त्यानंतर येथे अस्तित्वात आलेल्या इन्क्युबेशन सेंटरला ‘मॅजिकच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाले. हळूहळू कॉलेजमध्ये गुण मिळविण्यासाठी तयार होणारे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट प्रश्न सोडविणारे होत गेले. प्रश्न सोडविणारे हे प्रोजेक्ट प्रॉडक्टमध्ये रूपांतरित होत गेले. प्रॉडक्टमध्ये रूपांतरित हे प्रोजेक्ट पुढे स्टार्टअप्‌मध्ये रजिस्टर होत गेले. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मॅजिकसह दोन इन्क्युबेशन सेंटर्स सहकार्य करीत आहेत. त्यामुळे स्टार्टअप्‌ला औरंगाबादेत पोषक वातावरण व बळ मिळत गेले.

स्टार्टअप्‌साठी ही आनंदाची बातमी आहे. येथील ऑटोमोबाईल, फार्मा आणि मॅन्युफॅक्चरिंग या उद्योगांमुळे औरंगाबादेत स्टार्टअप्‌ला पोषक वातावरण आहे. आपल्याकडे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, आवश्यक जागा, पाठिंबा व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. येथे आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्‌ मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे, ही या शहराच्या भरभराटीसाठी चांगली गोष्ट आहे. कोरोनानंतर विदेशात जाऊन नोकरी - धंदा करण्यापेक्षा औरंगाबादेत स्टार्टअप्‌ सुरू करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

- रोहित दाशरथी, तरुण उद्योजक

Web Title: Aurangabad ranks number one in the world for startup growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.