औरंगाबादला मिळाले लसींचे २२ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:04 AM2021-05-27T04:04:02+5:302021-05-27T04:04:02+5:30
जिल्हा रुग्णालयात यंत्र नादुरुस्तीने चाचणी बंद औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी काही दिवसांपूर्वीच आरटीपीसीआर मोबाईल चाचणी प्रयोगशाळा दाखल ...
जिल्हा रुग्णालयात यंत्र
नादुरुस्तीने चाचणी बंद
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी काही दिवसांपूर्वीच आरटीपीसीआर मोबाईल चाचणी प्रयोगशाळा दाखल झाली आहे. परंतु उद्घाटनानंतर यंत्र नादुरुस्तीमुळे कोरोना चाचणी बंद असल्याची स्थिती आहे. यंत्र दुरुस्त होताच तपासण्या सुरू होतील, असे जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
घाटीला दिले पीपीई किट, मास्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयास एस. एम. सेहगल फाऊंडेशनतर्फे ३०० पीपीई किट, ३०० लीटर सॅनिटायझर, ३ हजार सर्जिकल मास्क, १५०० हातमोजे देण्यात आले. यावेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विकास राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाकुडकर, डॉ. नाझिया, डाॅ. अमोल खडसे, सेहगल फाऊंडेशनचे समन्वयक अमोल भिलंगे उपस्थित होते. समाजसेवा अधीक्षक संतोष पवार, संदीप भडंगे यांनी समन्वय साधून संस्थेसाठी साहित्य मिळवून दिले.
घाटीत झाडांच्या फांद्या रस्त्यावरच पडून
औरंगाबाद : घाटी रुग्णालय परिसरातील विद्युत वाहिन्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली. परंतु गेल्या चार दिवसांपासून या फांद्या रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. या फांद्या हटविण्याची मागणी होत आहे.
जिल्हा रुग्णालयाला २ रुग्णवाहिका
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाला मंगळवारी २ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदेखडकर, डाॅ. संतोष नाईकवाडे आदी उपस्थित होते. नव्या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची ने-आण करणे अधिक सोयीचे होणार असल्याचे सांगण्यात आले.