धावत्या सचखंड एक्स्प्रेसचे निघाले इंजिन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 02:40 PM2019-02-02T14:40:58+5:302019-02-02T15:16:10+5:30

अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन निघाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (2 फेब्रुवारी) दुपारी दौलताबादजवळ ही घटना घडली.

aurangabad sachkhand express engine running some distance leaving behind railway bogies | धावत्या सचखंड एक्स्प्रेसचे निघाले इंजिन 

धावत्या सचखंड एक्स्प्रेसचे निघाले इंजिन 

googlenewsNext
ठळक मुद्देअमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन निघाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (2 फेब्रुवारी) दुपारी दौलताबादजवळ ही घटना घडली. इंजिनला लागून असलेल्या बोगीत अधिक माल असल्यामुळे हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

औरंगाबाद - ताशी तीस किलोमीटर इतक्या वेगाने जाणाऱ्या अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन निघाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (2 फेब्रुवारी) दुपारी दौलताबादजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर ही रेल्वेऔरंगाबादला दाखल झाली. या ठिकाणी आवश्यक देखभाल दुरुस्ती करून रेल्वे रवाना होण्यासाठी सज्ज झाली. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून काही अंतरावर जात नाही ,तोच पुन्हा रेल्वेचे इंजिन निघाल्याची घटना घडली. या घटनेमुळे नांदेडला जाणारे प्रवासी खोळंबले. इंजिनला लागून असलेल्या बोगीत अधिक माल असल्यामुळे हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  सलग दोन वेळा हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे . रेल्वे प्लेटफॉर्म आणि रेल्वे रूळावर येऊन रेल्वे दुरुस्त होण्याची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. 

Web Title: aurangabad sachkhand express engine running some distance leaving behind railway bogies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.