औरंगाबादेत सूर्य आग ओकतोय

By Admin | Published: May 16, 2016 12:14 AM2016-05-16T00:14:47+5:302016-05-16T00:22:31+5:30

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे.

Aurangabad is the sun fire Okotoy | औरंगाबादेत सूर्य आग ओकतोय

औरंगाबादेत सूर्य आग ओकतोय

googlenewsNext

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईनेदेखील गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. परिणामी लहान बालकांबरोबर प्रौढ व्यक्तींनादेखील विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. एप्रिलमध्ये अंगणवाड्यांच्या माध्यमातून वजन घेण्यात आलेल्या बालकांपैकी जवळपास १४ हजार बालकांच्या वजनात कमालीची घट झाल्याचा खळबळजनक अहवाल समोर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. जिल्ह्यात ३ हजार १७८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये २ हजार ७०० मोठ्या अंगणवाड्या, तर ४७८ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमध्ये नोंदणी केलेल्या बालकांची संख्या २ लाख ३६ हजार ६९२ एवढी असून, दरमहा या बालकांचे वजन केले जाते, तसेच अंगणवाड्यांमार्फत बालकांना पोषण आहार तसेच आरोग्य पूरक सुविधाही पुरविल्या जातात. याशिवाय अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुलींना आरोग्यविषयक सल्ला, आरोग्य तपासणी केली जाते. 
तापमानामुळे उड्डाणपूलही तापला
वैशाखातील उन्हाचा तडाखा सर्व स्तरावर बसतो आहे. एमएसआरडीसीने बांधलेल्या महावीर चौकातील उड्डाणपुलालादेखील उन्हाचा फटका बसल्याचे ‘प्रूफ लोड टेस्ट’च्या पहिल्या दिवशी लक्षात आले.
मुंबईतील व्हीजेटी या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन समितीमार्फत त्या उड्डाणपुलाचे तापमान आणि उच्च वजन क्षमता तपासण्यासाठी रविवारी दुपारी १२.१० मिनिटांनी सुरुवात केली.
सोमवारी दुपारपर्यंत हे काम चालेल. डॉ.अभय बंबोले, गौरंग राऊत व टीमने पुलाच्यावर १५० टन वजन असलेले ट्रक उभे करून खाली डायल गेज, डिप्लिकेशन सेन्सरनुसार पुलाच्या क्षमतेच्या चाचणीचे नमुने संकलित केले. इंडियन रोड काँग्रेसच्या कोड नं. ५१ नुसार गुणवत्ता तपासणी करावी लागते. या तपासणीच्या प्रमाणपत्रानंतरच पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पूल वाहतुकीला खुला होईल. २४ तासांपर्यंत १५० टनाचे सहा ट्रक पुलाच्या ५० मीटर अंतराच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहेत. एका ट्रकमध्ये २५ टन वजनाचे साहित्य होते. 

Web Title: Aurangabad is the sun fire Okotoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.