युथ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस शिरसेला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:09 AM2019-02-22T01:09:23+5:302019-02-22T01:09:43+5:30
औरंगाबादच्या तेजस शिरसे याने जबरदस्त कामगिरी करताना रायपूर येथे सुरू असलेल्या युथ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात आज रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे दोनच महिन्यांत तेजस शिरसे याचे हे तिसरे मेडल ठरले आहे. रायपूर येथील स्पर्धेत तेजस शिरसे याने १00 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
औरंगाबाद : औरंगाबादच्या तेजस शिरसे याने जबरदस्त कामगिरी करताना रायपूर येथे सुरू असलेल्या युथ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात आज रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे दोनच महिन्यांत तेजस शिरसे याचे हे तिसरे मेडल ठरले आहे.
रायपूर येथील स्पर्धेत तेजस शिरसे याने १00 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक दिल्लीच्या रितेश चौधरी आणि कास्यपदक केरळच्या आर. के. सूर्यजीथ याने जिंकले. याआधी तेजस शिरसे याने पुणे येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही १00 मी. अडथळा शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते तसेच डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. तेजस शिरसे याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव फुलचंद सलामपुरे यांनी तेजस शिरसे याचे अभिनंदन केले आहे.