औरंगाबादमध्ये गतिमंदांनी केलेल्या उत्पादनांची कॉर्पोरेट जगताला लागली गोडी, रोजगारातून मिळाले स्वावलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 07:25 PM2017-12-09T19:25:27+5:302017-12-09T19:45:59+5:30
समाजाने गतीमंद ठरविले असले गतीमंदाचे उत्पादने आता विक्रीत गती घेऊ लागले आहेत. स्पेशल पार्ट्या, खास समारंभ व कॉर्पोरेट सेक्टरला यांच्या उत्पादनाने मोहीनी घातली आहे. त्यातून आर्थिक व सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी यातून मोठा आधार मिळत आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद: समाजाने गतीमंद ठरविले असले या गतीमंदाचे उत्पादने आता विक्रीत गती घेऊ लागले आहेत. स्पेशल पार्ट्या, खास समारंभ व कॉर्पोरेट सेक्टरला यांच्या उत्पादनाने यातील गुणवत्तेमुळे मोहीनी घातली आहे. त्यातून आर्थिक व सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी यातून मोठा आधार मिळत आहे.
चिकलठाणा एमआयडीसीतील नवजीवन मतीमंद शाळेत मुलांच्या बौद्धीकतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक कार्यशाळा घेण्यात येते. यातून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. यात शारीरिकदृष्ट्या वाढ झालेल्या या मुलांची बौद्धीकता वाढवणे व त्यांच्या हाताला चांगले वळण देणे यावर भर दिला जातो. यातून ही गतीमंद मुलं आता कौशल्याने ‘कँडी व चॉकलेट’ बनविण्यात तरबेज झाली आहे. या मुलांची दिनचर्या ठरलेली असून, त्यांना सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मार्गदर्शन केले जाते. त्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी त्यांय ाहाताला व बुद्धीला वळण देण्याचे काम विविध स्तरातील समविचारी जानकारांनी मिळून ही संस्था तयार केली आहे. ती अविरत या मुलांच्या विकासासाठी कार्यरत असून, मुलांना कुणी घरात बोज आहे, असे हिनविणार नाही, याविषयीचा आत्मविश्वास या मुलांत भरविला जातो.
गतीमंदाची गती वाढविणारे शिल्पकार.
शाळेतील मुलांनी तयार केलेले उत्पादने विक्रीसाठी जेव्हा कॉरपोरेट सेक्टरच्या काही अधिका-यांनी पाहिले तर त्यांनी दरवर्षी या मुलांच्या वर्कशॉपमधूनच उत्पादने घेण्याचे ठरविले आहे. या मुलांचे कौशल्य विकसीत करून त्यांच्या हाताला व बुद्धीला वळण देण्याचे काम चित्रा सुरडकर, शिला तुमराम, त्र्यंबक कुलकर्णी, प्रशांत सराफ, अभिजीत जोशी सातत्याने करीत आहेत.
गुणवत्तेमुळे गोडी वाढली
या मुलांची उत्पादने एका ठराविक काळात तयार केले जातात, त्याची गोडी कॉरपोरेट सेक्टर आणि उच्चभ्रु सोसायटीत अधिक वाढली आहे. उत्पादनाचे कार्य अगदी टिमवर्क असून सततच्या कामामुळे त्यांच्या बुद्धीमतेत देखील भर पडल्याचे जाणवते. पाककृती ही निदेशकाच्या देखरेखीखाली अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने केली जाते. बुद्यांकानुसार या मुलाचीही वर्गवारी केली जाते. अधुनिक पद्धतीने बनविलेल्या या चॉकलेच्या सजावटीपासून पार्सल पोहोचविण्यापर्यंत ही मुलं अगदी तरबेज व्यक्तीप्रमाणे काम करतात. घरातही आईबाबा किंवा इतर भावंडांना नको वाटणारी किंवा बोज वाटणारी मुलं आता गोडी निर्माण करीत आहेत. कारण आईला घरात भाजी निवडणे, कांदा लसून, मिरची, धुणं, झाडू तसेच किरकोळ कामं देखील प्रमुख्याने करीत असल्याने त्यांचा घरातील वावर देखील वाढलेला आहे.
कार्यशाळेतून मिळाला रोजगार
आपण घरातील नातेवाईक व आप्तेसंबंधावर विसंबून राहिलेलो नसल्याचा भास या मुलांना देखील वाटू लागला आहे. कागदी पिशव्या, कारखाने व कार्यालयात लागणा-या स्टेशनरी देखील या मुलांकडून पुरविल्या जात आहेत.कॉरपोरेट सेक्टरची काही कारखाने या मुलांकडून चॉकलेट, कॅन्डी समारंभासाठी तसेच कार्यालयासाठी स्टेशनरीची सतत मागणी करीत आहे.
ताठमानेने जगण्यासाठी धडपड
सामाजिक व आर्थिक स्थैर्य या मुलांत निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केला जात असून, बौद्धीक क्षमता वाढीसाठी हि कार्यशाळा आहे. होमसायन्स, शिवनकला, आर्ट डिझाईन अशा विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात कौशल्ये जागृत केले आहे. असे डॉ. रामदास अंबुलगेकर यांनी सांगितले.