औरंगाबाद लोकसभेसाठीचे दोन इच्छुक शांतिगिरी महाराज व भापकर एकाच व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:58 PM2018-01-22T12:58:03+5:302018-01-22T13:02:24+5:30

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्राची आवड आहे. भापकरी छाप पाडण्याचे काम ते या क्षेत्रात करतील. भापकर हजार पट मोठे व्हावेत. समाजाची व जनता ‘जनार्दना’ची सेवा त्यांच्या हातून व्हावी, अशी स्तुतिसुमने शांतीगिरी महाराज यांनी डॉ. भापकर यांच्याविषयी मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उधळली. महाराजांनी डॉ. भापकरांची सूचक वक्तव्याप्रमाणे केलेली स्तुती खूप काही सांगून गेली. 

Aurangabad, the two interested Shantigiri Maharaj and Bhapkar for the Lok Sabha, have the same platform | औरंगाबाद लोकसभेसाठीचे दोन इच्छुक शांतिगिरी महाराज व भापकर एकाच व्यासपीठ

औरंगाबाद लोकसभेसाठीचे दोन इच्छुक शांतिगिरी महाराज व भापकर एकाच व्यासपीठ

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप आणि संघाची छाप असलेला हा मेळावा चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

औरंगाबाद : विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्राची आवड आहे. भापकरी छाप पाडण्याचे काम ते या क्षेत्रात करतील. भापकर हजार पट मोठे व्हावेत. समाजाची व जनता ‘जनार्दना’ची सेवा त्यांच्या हातून व्हावी, अशी स्तुतिसुमने शांतीगिरी महाराज यांनी डॉ. भापकर यांच्याविषयी मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उधळली. महाराजांनी डॉ. भापकरांची सूचक वक्तव्याप्रमाणे केलेली स्तुती खूप काही सांगून गेली. 

भाजप आणि संघाची छाप असलेला हा मेळावा चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शांतीगिरी महाराज आणि डॉ. भापकर हे दोघेही एकाच व्यासपीठावर राज्यात सरकारच्या योजना प्रचार-प्रसार करण्याचे काम करणार्‍या संस्थेबरोबर आल्यामुळे दोघांपैकी एक भाजपचा उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतल्यानंतर ते जाहीरपणे एखाद्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येण्याची पहिली घटना आहे, तर काही महिन्यांपासून डॉ. भापकर हे भाजपचे उमदेवार असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. डॉ. भापकर आगामी काळात जनतेची सेवा करतील की ‘जनार्दना’ची हे आगामी काळात समोर येईल. मेळाव्यात उद्योजक तथा सीआयआयचे अध्यक्ष ऋषी बागला, धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी एनजीओंना मार्गदर्शन केले. यावेळी विजय उक्कलगावकर, रा.स्वं. संघाचे प्रांत संघचालक अ‍ॅड. गंगाधर पवार, डॉ. प्रदीप देशपांडे, डॉ. शिरीष कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, उद्योजक श्रीराम नारायण, डॉ. अनंत पंढरे, डॉ. प्रसन्न पाटील आदींची उपस्थिती होती. दिवाकर कुलकर्णी यांनी आभार मानले. मेळाव्यात विभागातील १२० एनजीओंनी सहभाग नोंदविला. 

भापकरांची अशी रणधुमाळी
डॉ. भापकरांनी मार्गदर्शन करताना प्रचार रणधुमाळी सुरू केल्याप्रमाणे मराठवाड्यात एक वर्षापूर्वी प्रशासकीय कामांची काय अवस्था होती आणि आता सद्य:स्थिती काय आहे, याचा पाढा वाचला. शांतीगिरी महाराजांच्या स्तुतीला साजेशी उत्तरे देताना ते म्हणाले, सर्वांना एकत्र आणणे महत्त्वाचे आहे. २३ पैकी ११ लाख शौचालये १ वर्षांत बांधली. सचिव असताना मनरेगाची अनेक कामे केली. २२ हजार शेततळे मंजूर केली. २५ हजार शेततेळ मार्चपर्यंत देण्याची तयारी आहे. ४ हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी ‘उभारी’ योजना आणली. जायकवाडी भरल्यामुळे रबी, खरिपासाठी ४ पाळ्या पाणी देण्याची संधी आहे.

Web Title: Aurangabad, the two interested Shantigiri Maharaj and Bhapkar for the Lok Sabha, have the same platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.