औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत नियोजनाचा उडाला फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 10:20 PM2017-11-24T22:20:51+5:302017-11-24T22:21:03+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले.

Aurangabad University's Legislative Election | औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत नियोजनाचा उडाला फज्जा

औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत नियोजनाचा उडाला फज्जा

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात मतदानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला. उस्मानाबाद उपकेंद्राच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहचल्या. तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठीची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे समोर आले. या गोंधळातही प्राध्यापकांनी विक्रमी मतदान केले आहे.
विद्यापीठाच्या अधिसभासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यात महाविद्यालयातील शिक्षक गटात १० जागा, विद्यापीठीय शिक्षकांसाठी ३, प्राचार्य ८ (दोन बिनविरोध), प्राचार्य ८ (दोन बिनविरोध), संस्थाचालक ४ (दोन बिनविरोध) आणि विद्यापरिषदेसाठी ७ (एक बिनविरोध) जागांचा समावेश होता. सकाळी आठ वाजता मतदानाला सुुरुवात झाली. हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालले. यात प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचलकांनी हिरारीने सहभागी होत मतदानाची आकडेवारीत भर घातली. पहिल्या टप्प्यातील मतदान पात्र-अपात्रेपासून सुरु असलेला गोंधळ मतदान होईपर्यंत कायम राहिला. अनेक मतदान केंद्रातील अधिका-यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. ज्या सूचना होत्या त्यातील अनेक सुचनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष केंद्रांवर झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले. मतदान केंद्रावर पाळण्यात येणारे नियम, सुचना, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवरांचे ओळखपत्र या सर्वांमध्ये प्रत्यक्षात सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नेते, मतदार नसलेले लोक मतदान केंद्रात बसून फोन करणे, मतदार मतदानासाठी जात असताना सूचना देण्याचे काम करत असल्याचेही दिसून आले. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्यांनी अनुपस्थित राहण्यालाच पसंती दिल्याबद्दलही सर्वत्र आश्चार्य व्यक्त होत आहे.

मतपत्रिका दुपारनंतर पोहचल्या
विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहचल्या. यानंतर मतदान झाले. या मतपत्रिका घेऊन जाणाºया गाडीत वाटेतच बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. मात्र उपकेंद्रातील मतदान विद्यापीठ विकास मंचला मिळणार नसल्यामुळे जाणिवपूर्वक मतपत्रिकाच पाठविण्यास विद्यापीठ प्रशासनाने कुचराई केल्याचा आरोप उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी केला आहे. तर कायमच उपकेंद्राकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रा. संभाजी भोसले यांनी सांगितले.

विद्यापीठात वाटल्या महाविद्यालयाच्या मतपत्रिका
विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी स्वतंत्र गट निर्माण केलेला आहे. तरीही विद्यापीठातील मतदना केंद्रावर महाविद्यालयातील शिक्षकांसाठी असणाºया मतपत्रिका सुुरुवातीला वाटण्यात आल्याचा प्रकार घडला. मात्र अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत कोकाटे यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षकांच्या मतपत्रिका फाडून टाकल्या. तोपर्यंत काही मतदारांना महाविद्यालयातील शिक्षकांसाठी मतदान केल्याचे समजते. यावर डॉ. साधना पांडे यांनी त्या मतपत्रिका मतमोजणीत ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे सांगितले.
 

उमेदवरांना आडवले
विद्यापीठात मतदान संपल्यानंतर मतपेत्या सिल करण्यासाठी उमेदवरांच्या सह्या घेतल्या जातात. या सह्या करण्यासाठी उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. राम चव्हाण मतदान केंद्रात जात असताना पोलिसांनी त्यांनाच आडवले. उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतरही आत सोडण्यात आले नाही. शेवटी बाचाबाची झाल्यानंतर आत सोडण्यात आले. तर याच केंद्रावर काही वेळ मतदारांना लाल शाईचा पेन मतदान करण्यासाठी दिला होता.

मतपत्रिकेतही चुका
विद्यापरिषदेच्या गटात फॅकल्टी आॅफ इंटर डिसीप्लीनरी स्टडीजच्या प्रवर्गाची मतपत्रिकामध्ये उत्कर्षचे उमेदवार डॉ. प्रभाकर लहुराव कराड यांच्या नावासमोर पसंतीक्रमांक दर्शविणारी चौकट जाणिवपूर्वक लहान आकाराची बनवली असल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार उत्कर्ष पॅनलच्या पदवीधर गटाचे उमेदवार डॉ. भारत खैरनार यांनी डॉ. पांडे यांना दिली.

झालेल्या मतदनाची आकडेवारी
गट एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी
महाविद्यालयीन शिक्षक३४३४ ३२१९ ९३.७४
विद्यापीठ शिक्षक १७२ १६८ ९७.६७
संस्थाचालक १७४ १७२ ९८.८६
प्राचार्य १०५ १०२ ९७.१५
विद्यापरिषद ३४३४ ३२१९ ९३.७४

Web Title: Aurangabad University's Legislative Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.