Aurangabad Violence : २४ दंगलखोरांना गुरुवारपर्यंत कोठडी; कोर्टाला छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:57 AM2018-05-14T11:57:26+5:302018-05-14T11:57:43+5:30

दंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहंमद यांनी दिले.

Aurangabad Violence: 24 rioters detained till Thursday; Appearance of the court | Aurangabad Violence : २४ दंगलखोरांना गुरुवारपर्यंत कोठडी; कोर्टाला छावणीचे स्वरूप

Aurangabad Violence : २४ दंगलखोरांना गुरुवारपर्यंत कोठडी; कोर्टाला छावणीचे स्वरूप

googlenewsNext
ठळक मुद्देदंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले.

औरंगाबाद : दंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहंमद यांनी दिले. पोलिसांनी अटक केल्यानंतर लॉकअपमध्ये बेदम मारहाण केल्याचा आरोप काही आरोपींनी केला. तक्रारीची दखल घेऊन आरोपींची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ७, भारतीय हत्यार कायद्याचे ४ व २५ कलमान्वये, तसेच संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता अनेक आरोपींनी स्वत:ची ओळख लपवून खोटी नावे सांगितल्याने त्यांची खरी ओळख पटवणे बाकी आहे,  आरोपींनी   ज्वलनशील पदार्थ हस्तगत करणे, आरोपींच्या साथीदारांचा शोध घेणे आहे, आरोपींना उत्तेजन देणारे कोण आहेत, त्यांची नावे व पत्ते निष्पन्न करावयाची आहेत,  दंगलीमागील सूत्रधार व षड्यंत्र रचणारे कोण व त्यांची नावे निष्पन्न करणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. 

ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आरोपींनी कोर्टात केल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या तक्रारीची दखल घेत निजी कक्षात इन कॅमेरा सुनावणी घेतली. सुटीच्या न्यायालयात २४ जणांना हजर करण्यात येणार असल्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. 

Web Title: Aurangabad Violence: 24 rioters detained till Thursday; Appearance of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.