औरंगाबाद हिंसाचारातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात अटक, सिटी चौक भागात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:12 PM2018-06-26T19:12:58+5:302018-06-26T19:13:47+5:30
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली.
औरंगाबाद : शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. याची माहिती मिळताच त्या तरुणांना सोडून देण्याची मागणी करत सिटी चौक पोलीस स्टेशनसमोर जमावाकडून निदर्शने करण्यात आली. यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.
औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात सहा जणांना अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला. यासोबतच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह जमावाने त्या तरुणांना सोडून देण्याची मागणी पोलिसांकडे केली. यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे मोठे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
यानंतर सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद दाखल झाले. त्यांनी आमदार इम्तियाज जलील यांच्यासह जमावाची समजूत काढली. आता या भागातील तणाव निवळला आहे.