औरंगाबादच्या प्रतीक्षाची ‘खेलो इंडिया’साठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:53 AM2018-01-22T00:53:59+5:302018-01-22T00:54:46+5:30
नवी दिल्ली येथे ‘खेलो इंडिया’अंतर्गत होणाºया अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय धावपटू प्रतीक्षा सणस हिची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणाºया औरंगाबाद येथील पूनम नवगिरे यांची प्रशिक्षिका म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र संघाचे शिबीर सध्या पुणे येथे सुरु आहे.
औरंगाबाद : नवी दिल्ली येथे ‘खेलो इंडिया’अंतर्गत होणाºया अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय धावपटू प्रतीक्षा सणस हिची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणाºया औरंगाबाद येथील पूनम नवगिरे यांची प्रशिक्षिका म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र संघाचे शिबीर सध्या पुणे येथे सुरु आहे.
प्रतीक्षा सणस ही गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त कामगिरी करीत आहे. तिने २0१४ साली विशखापट्टणम येथे राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच २0१५ मध्ये रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील ट्रायथलॉनमध्ये गोल्डन कामगिरी केली होती. २0१६ मध्येही तिने वडोदरा येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. तिच्या या कामगिरीची दखल भारताची प्रख्यात धावपटू पी. टी. उषा हिनेदेखील घेताना तिची विशेष प्रशंसा केली होती. गतवर्षी तिने भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रिलेत कास्यपदक जिंकून देण्यात योगदान दिले होते. खेलो इंडियाअंतर्गत अॅथलेटिक्समध्ये प्रतीक्षा सणस ही ४ बाय १00 मीटर रिलेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रतीक्षा सणस हिला पूनम नवगिरे आणि सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.