औरंगाबादला मध्यरात्री पावसाने झोडपले; शहरातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:46 AM2020-06-25T10:46:25+5:302020-06-25T10:55:22+5:30

महापालिका हद्दीत १२२ मिमी पाऊस झाला

Aurangabad was lashed by rains at midnight; Heavy rainfall recorded in four circles in the city | औरंगाबादला मध्यरात्री पावसाने झोडपले; शहरातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद

औरंगाबादला मध्यरात्री पावसाने झोडपले; शहरातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद

googlenewsNext

औरंगाबाद:  बुधवारी मध्यरात्री १.३० वाजेपासून पहाटे ४ वाजेपर्यंत शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. महापालिका हद्दीत १२२ मिमी पाऊस झाला असून शहरातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली.

शहरातील भावसिंगपुरा, कांचनवाडी मंडळात 100 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

रात्री१.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. तालुक्यात 62.50 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.

अनेक वसाहतीत पाणी शिरल्याने नागरिक  जीव मुठीत घेऊन जागेच राहिले. वॉर्ड क्र. 92 मधील गणेशनगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले.सारा-सिद्धी सोसायटी, बीडबायपास येथे सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून रस्त्यांवर पाणी साचले आहे.

Web Title: Aurangabad was lashed by rains at midnight; Heavy rainfall recorded in four circles in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.