राज्य स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:47 AM2019-02-05T00:47:25+5:302019-02-05T00:48:19+5:30

बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Aurangabad wins title in state skating competition | राज्य स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला विजेतेपद

राज्य स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला विजेतेपद

googlenewsNext
ठळक मुद्देयजमान बीडने मिळवले उपविजेतेपद : नाशिक संघ तिसऱ्या क्रमांकावर

औरंगाबाद : बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचा निकाल : ४ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन मुले) : १. दानिश अमीर, ४ वर्षांखालील मुली : (कॉड) : १. धनश्री बडगुजर, २. कनिका लोधा. ६ वर्षांखालील (प्रोफेशनल इनलाईन मुले) : १. आर्यन जैन, ६ वर्षांखालील फॅन्सी इनलाईन मुले : १. लेख तिवारी, २. अलियान हुसेन, ३. अक्षत ताठे, ३. संग्राम गोटे. ६ वर्षांखालील (बिगनर) : १. अर्जुन राठोड, २. पार्थ शर्मा, ३. राजरत्न कांबळे. ४ ते ६ (कॉड मुले) : १. अर्णव गिरी, २. ओमकार जवळ, ३. आयुष पांडुळे. ८ वर्षांखालील (प्रोफेशनल इनलाईन मुले) : १. साईरिनेश नटराजन. ८ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन मुले) : १. सम्राट कांबळे, २. ओम उगले. ८ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन - मुली) : १. मानवी साबळे, २. एम. टेंभुर्णे. ८ वर्षांखालील (बिगनर-मुले) : १. आनंद सोनी, २. प्रतीक वाघमारे, ३. सार्थक झा. ८ वर्षांखालील (कॉड-मुले) : १. दर्शन निकम, २. अथर्व बाविस्कर, ३. अमित सानप. ६ ते ८ वर्षांखालील (कॉड मुली) : १. हर्षदा निकम. ८ ते १0 (प्रोफेशनल इनलाईन-मुले) : १. अथर्व कुलकर्णी, २. सोहम पाटील, ३. सार्थ मुळे. ८ ते १0 (फॅन्सी इनलाईन मुले) : १. आयुष आडे, २. यदुवीर भोसले, ३. राजवर्धन धुमाळे, ३. साहील शेळके. १0 वर्षांखालील (कॉड -मुली) : १. आचल लोढा, २. रश्मी गरुड. ८ ते १0 (फॅन्सी इनलाईन-मुली) : १. अनिष्का पवार. ८ ते १0 (कॉड-मुले) : १. रितेश घोलप, २. विजय अंबाडे, ३. ज्ञानेश्वर केदार. १0 ते १२ (प्रोफेशनल इनलाईन -मुले) : १. प्रथमेश राठोड, २. दीप्तेश नरवाडे, ३. वेद तिवारी. १0 ते १२ (कॉड मुले) : १. अरिहंत गांधी, २. सार्थक बनसोडे, ३. ओमकार भंडारी.
१0 ते १२ (फॅन्सी-इनलाईन मुली) : १. ज्ञानेश्वरी पवार. १0 ते १२ (कॉड मुली) : १. जान्हवी ढाकणे, २. कोमल खिंवसरा. १२ ते १४ (प्रोफेशनल इनलाईन-मुले) : १. साई अंबे, २. अनुज मेवाडा, ३. आयुष श्रीवास्तव. १२ ते १४ (फॅन्सी इनलाईन मुले) : १. देव भाले. १२ ते १४ (कॉड-मुले) : १. नेहलसिंग, २. ओमसिंग परदेशी. १२ ते १४ (कॉड मुली) : १. रेणुका परदेशी. खुला गट (प्रोफेशनल इनलाईन मुले) : १. अभिजित सरवदे. खुला गट (कॉड-मुले) : १. दर्शन निकम.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन सुभाष जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव भिकन अंबे, कोषाध्यक्ष नितीन काठोदे, बीड जिल्हा संघटनेचे सचिव रामदास गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून वैभव गिरी, राधिका आंबे, सूर्यकांत घोलप, विनोद दादेवाड, नितीन खैरनार, विशाल खैरनार, विशाल गिरी यांनी भूमिका पार पाडली.

Web Title: Aurangabad wins title in state skating competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.