औरंगाबादमध्ये साडेचार कोटी रुपये खड्ड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:52 PM2017-12-04T23:52:51+5:302017-12-04T23:52:59+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिकेला दिले. मागील एक महिन्यापासून तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजविण्याची मोहीम राबविण्यात आली.

 Aurangabad worth four and a half million rupees! | औरंगाबादमध्ये साडेचार कोटी रुपये खड्ड्यात!

औरंगाबादमध्ये साडेचार कोटी रुपये खड्ड्यात!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिकेला दिले. मागील एक महिन्यापासून तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजविण्याची मोहीम राबविण्यात आली. वर्षानुवर्षे शहराला खड्ड्यात घालण्याचे काम करणा-या कंत्राटदारांना हे काम देण्यात आले. त्यांनी सवयीनुसार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले. हे काम सुरू असताना एकही अधिकारी, कर्मचारी फिरकला नाही. कार्यालयात बसून कंत्राटदारांना रस्त्यांची यादी देण्यात आली. कंत्राटदारांनी खड्ड्यांचा त्रास कमी करण्याऐवजी उलट वाढवून ठेवला आहे. शहरातील पॅचवर्क पाहून आता औरंगाबादकरांना वाटू लागले की, पूर्वीचे खड्डेच बरे होते.
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले होते. मागील दीड ते दोन वर्षांपासून मनपाकडून पॅचवर्क करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. गणेशोत्सव किंवा अन्य कोणताही मोठा सण आल्यास फक्त मुरुम आणि माती टाकून खड्डे बुजविण्यात येत होते. कायमस्वरूपी शहरातील खड्डे बुजावेत, अशी प्रामाणिक इच्छा मनपा अधिकाºयांची दिसत नाही. मुरुम, डांबरी पॅचवर्कची कामे नेहमी सुरू असावीत हा यामागचा अट्टहास असतो. शहरातील रस्त्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे. या अनुषंगाने खंडपीठाने महापालिकेला मागील महिन्याच्या २० तारखेलाच खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश दिले.
महापालिकाही आदेशाची पूर्तता करण्यासाठी सरसावली. मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालयानुसार निविदा काढण्यात (पान २ वर)
तीन इंचाचे थर
सर्वच कंत्राटदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क करून ठेवले आहेत. त्यामुळे या पॅचवर्कचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागतो. रस्त्यापासून दोन ते तीन इंच उंचीचे हे पॅचवर्क आहेत. यावरून दुचाकी नेल्यास अक्षरश: आदळआपट होते. मनपाच्या या पॅचवर्कपेक्षा जुने खड्डेच बरे होते, असेही म्हणण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे.
खडीच खडी रस्त्यावर
पोलीस मेस ते कटकटगेट रोड, शिवाजी हायस्कूलसमोरील रोड, व्हीआयपी रोड अशा अनेक रस्त्यांवर पॅचवर्कची खडी रस्त्यावर विखुरल्या जात असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. काही वाहनधारक घसरून पडण्याचे प्रकारही सुरू आहेत.

Web Title:  Aurangabad worth four and a half million rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.