औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:35 AM2018-03-25T00:35:47+5:302018-03-25T00:38:25+5:30

शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले.

Aurangabadi Guardian Minister came and gone | औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

googlenewsNext
ठळक मुद्देकचऱ्याचा प्रश्न कायम : मनपाच्या कामांची निव्वळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले. त्यांनी जिल्हा कचेरीत कचरा प्रश्नाचा आढावा घेतला. कॅरिबॅग बंदीची अंमलबजावणी करावी, कच-याचे वर्गीकरण करा, कामाची क्षमता वाढवा एवढाच सल्ला देऊन ते भुर्रकन निघून गेले. कचरा प्रश्नात ठोस असा कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता तर पालकमंत्री कशासाठी आले होते, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.
शहरातील कचºयाचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिटा येथे दंगलही उसळली होती. एवढे सर्व होत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औैरंगाबाद शहराकडे फिरकले नाहीत.
नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी एकदा ते आले होते. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री आहेत किंवा नाही, अशी अवस्था निर्माण झालेली असताना शनिवारी शहरात त्यांनी एन्ट्री मारली. महापालिकेकडून जिथे कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे, त्या केंद्रांना त्यांनी भेट देऊन कामाची प्रशंसा केली.
मध्यवर्ती जकात नाका, चिश्तिया चौैक, बळीराम पाटील चौक येथे पाहणी केली. सत्यविष्णू हॉस्पिटल येथे ओल्या कचºयापासून होणारी खतनिर्मिती, रमानगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही त्यांनी घेतली.
यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, आ. संदीपान भुमरे, सीईओ मधुकर आर्दड, नगरसेवक राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर आदी उपस्थित होते.
शहरात फक्त ५ टक्के कचरा
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या शहरात केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात १५ हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील १४ हजार ६४६ मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे, सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, ७०२ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी पूर्वी ३५ पीट (खड्डे) घेण्यात आले होते. आता ७७ पीट तयार करण्यात आले आहेत.
पात्रकमंत्र्यांनी दिली सूचनांची पंचसूत्री
घनकचरा व्यवस्थापनाबाबत कामाची गती वाढविण्यात यावी. अधिकाºयांनी सतर्कता बाळगावी. समन्वय ठेवून काम करावे.
सफाई कामगार आणि कचरा वेचकांना ग्लोज, मास्क, गम बूट इत्यादी साहित्य द्यावे.
सफाई कर्मचारी आणि कचरा वेचकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.
कचरा वेचकांना ओळखपत्र देण्यात यावे.
कामाची गती अधिक तीव्र करण्यात यावी.

Web Title: Aurangabadi Guardian Minister came and gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.