औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 

By संतोष हिरेमठ | Published: September 3, 2022 05:01 PM2022-09-03T17:01:23+5:302022-09-03T17:02:16+5:30

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून आतापर्यंत या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Aurangabadians be careful, 21-year-old girl dies of swine flu | औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शनिवारी समोर आली. 

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून आतापर्यंत या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. निदान झालेल्या स्वाइन फ्लू रुग्णांसाठी टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. मनपाच्या ५ केंद्रांमध्ये लसही उपलब्ध आहे. नागरिकांनी कोरोनाप्रमाणे आताही काळजी घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Aurangabadians be careful, 21-year-old girl dies of swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.