औरंगाबादकरांनो, विषाणूची तरी भीती बाळगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:04 AM2021-05-27T04:04:52+5:302021-05-27T04:04:52+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना विषाणूची नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग अधिक प्रभावशाली झाला. त्यामुळे मृत्यूचे ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना विषाणूची नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग अधिक प्रभावशाली झाला. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण दहापट वाढले. तरीही ही बाब औरंगाबादकर गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या ५०० नागरिकांची दररोज कोरोना तपासणी करण्यात येत आहे. तरीही रस्त्यांवरील गर्दी कमी होईना. किमान विषाणूची तरी भीती बाळगा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राज्य शासनाने दीड महिन्यापूर्वी कडक निर्बंध जाहीर केल्यानंतर मनपा आणि पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. शहरातील प्रमुख दहा ठिकाणी पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यात जवळपास पाच हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ९२ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. नागरिकांनी प्रशासनाची नव्हे, तर किमान व्हायरसची भीती बाळगायला हवी, असे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
आठ दिवसांतील तपासणीचे आकडे
मे महिना - कोरोना तपासणी
२० - ४९४
२१ - ५३९
२२ - ४८२
२३ - ३७१
२४ - ४३५
२५ - ५९८
२६ - ४५५