औरंगाबादकरांनो पुढे या ! कोरोना लसची महिनाभर चिंता मिटली; मुबलक साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 05:51 PM2021-08-23T17:51:16+5:302021-08-23T17:54:09+5:30
Corona vaccine in Aurangabad : १६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यात शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे.
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस ( Corona vaccine ) घेण्यासाठी शहरात सर्वसामान्य नागरिक आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, शासनाकडून मुबलक प्रमाणात साठा मिळत नसल्याने नागरिकांना पहिल्या, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता पुढील महिनाभर तरी जिल्ह्याला लसची टंचाई जाणवणार नाही. बजाज कंपनी काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत २ लाख ३० हजार डोस उपलब्ध करून देत आहे. या शिवाय शासनाकडून दर आठवड्याला २० ते २५ हजार डोस मिळणार आहेत. ( Corona vaccine relieved anxiety for a month; Abundant stocks available in Aurangabad )
१६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यात शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा टक्का १०.९४ एवढा आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार ८४ एवढे निश्चित झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळायला तयार नाही. आठवड्यातून चार ते पाच दिवस लस नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोहीम बंद ठेवावी लागते. बजाज समूहाने सीएआरमधून शहराला १ लाख १५ हजार तर ग्रामीणलाही १ लाख १५ हजार डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हा साठा प्राप्त होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे.
'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक
शहरात ६.७६ लाख लसीकरण
शहरात महापालिकेने लसीकरणाचे उद्दिष्ट ११ लाख ७६ हजार ९९९ एवढे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात लसीकरणाची टक्केवारी अधिक आहे. शहरात ६ लाख ७६ हजार ४४ नागरिकांचे लसीकरण झाले. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही केवळ १ लाख ९९ हजार ९९७ एवढी आहे. दुसरा डोसचे हे प्रमाण निश्चित टार्गेेटच्या केवळ १६.९९ टक्के एवढे आहे.
ग्रामीणमध्ये ७.५६ टक्के लसीकरण
ग्रामीण भागात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचे उद्दिष्ट २१ लाख १० हजार ८१५ एवढे आहे. ग्रामीणमध्ये २४.४४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. दुसऱ्या डोसचे प्रमाण केवळ ७.५६ टक्के आहे. ग्रामीणमध्ये १ लाख ५९ हजार ६८१ नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
आतापर्यंतचे लसीकरण
भाग- निश्चित उद्दिष्ट- पहिला डोस - दुसरा डोस
ग्रामीण २१,१०,८१५ - ५,१५,८०३ - १,५९,६८१
शहर ११,७६,९९ - ४,७६,०४७ - १,९९,९९७
एकूण ३२,८७,८१४ - ९,९१,८५० - ३,५९,६७८
टक्केवारी १०० टक्के - ३०.१७ टक्के - १०.९४ टक्के.
बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट