औरंगाबादकरांना सकाळ ठरली धक्का देणारी, मोबाईल मेकॅनिक आणि किराणा दुकानदाराने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:21 PM2017-10-23T16:21:55+5:302017-10-23T16:23:19+5:30

पुंडलिकनगर येथे मोबाईल मेकॅनिकने तर  रमानगरात किराणा दुकानदाराने अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना आज सकाळी उघडकीस आल्या.

Aurangabadkar's morning walk shocked, mobile mechanic and grocery store keeper ended life | औरंगाबादकरांना सकाळ ठरली धक्का देणारी, मोबाईल मेकॅनिक आणि किराणा दुकानदाराने संपविली जीवनयात्रा

औरंगाबादकरांना सकाळ ठरली धक्का देणारी, मोबाईल मेकॅनिक आणि किराणा दुकानदाराने संपविली जीवनयात्रा

googlenewsNext
ठळक मुद्दे पुंडलिकनगर येथील गल्ली नंबर १ मध्ये संतोष रामदास दारटकर (वय ३५)हा मेकॅनिक असून तो पैठणगेट येथील एका दुकानात मोबाईल दुरूस्तीचे काम करतोरमानगर येथे घडलेल्या अन्य एका घटनेत किराणा दुकानदार कृष्णा तुळशीराम वाहुळ(वय ५०)यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

औरंगाबाद : पुंडलिकनगर येथे मोबाईल मेकॅनिकने तर  रमानगरात किराणा दुकानदाराने अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना आज सकाळी उघडकीस आल्या. याप्रकरणी अनुक्रमे पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर येथील गल्ली नंबर १ मध्ये संतोष रामदास दारटकर (वय ३५)हा मेकॅनिक असून तो पैठणगेट येथील एका दुकानात मोबाईल दुरूस्तीचे काम करतो. त्याची पत्नी मुलगा आणि मुलीसह भाऊबीज निमित्त माहेरी गेली होती. यामुळे रविवारी रात्री तो घरी एकटाच होता. रात्री केव्हातरी त्याने राहत्या घरात पंख्याला साडीने बांधून गळफास घेतला. सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तो झोपेतून न उठल्याने शेजा-यांनी खिडकीतून संतोषच्या रूममध्ये डोकावून पाहिले. असता त्याने गळफास घेतल्याचे दिसले. याघटनेची माहिती त्याच्या नातेवाईक आणि पोलिसांना देण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक सय्यद आणि पोलीस हेडकाँन्स्टेबल एकनाथ चव्हाण, दीपक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोषला बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी संतोषला तपासून मृत घोषित केले. संतोषच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोहेकाँ एकनाथ चव्हाण करीत आहे.

रमानगर येथे घडलेल्या अन्य एका घटनेत किराणा दुकानदार कृष्णा तुळशीराम वाहुळ(वय ५०)यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा हे रमानगर येथे किराणा दुकान चालवितात. या दुकानाच्या मागील खोली ते राहतात.  रविवारी दिवसभर किराणा दुकान चालविल्यानंतर  रात्री जेवण करून ते झोपले. सकाळी  नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले नाही. त्यांनी त्यांच्या बेडरूमध्ये छताच्या लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण  समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोलीस हेड काँन्स्टेबल पी.एन. शुक्ला करीत आहे.

Web Title: Aurangabadkar's morning walk shocked, mobile mechanic and grocery store keeper ended life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू