आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णवला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:44 AM2017-11-21T00:44:31+5:302017-11-21T00:45:28+5:30
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर नुकत्याच झालेल्या १२ वर्षांखालील आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णव पांगारकर याने उपविजेतेपद पटकावले. त्याला अंतिम सामन्यात गुजरातच्या याग्ना पटेल याच्याकडून ३-६, ६-३, ६-0 असा पराभव पत्करावा लागला.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर नुकत्याच झालेल्या १२ वर्षांखालील आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णव पांगारकर याने उपविजेतेपद पटकावले. त्याला अंतिम सामन्यात गुजरातच्या याग्ना पटेल याच्याकडून ३-६, ६-३, ६-0 असा पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरी गाठण्याआधी अर्णवने उपांत्यपूर्व फेरीत नीरज रिंगणगावकरचा ८-२ आणि उपांत्य फेरीत पार्थ देवरुखकरचा ९-५ असा पराभव केला होता.
मुलींच्या गटात सानिका भोगाडे हिने विजेतेपद पटकावले. नगरच्या सानिका हिने मुंबईच्या उर्वी काटे हिचा ६-0, ६-२ असा पराभव केला. अंतिम सामन्यानंतर सौरभ कटियार यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या प्रसंगी आशुतोष मिश्रा, टुर्नांमेंट सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे आणि गजेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.