औरंगाबादचा जगात गाजावाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:05 AM2021-07-02T04:05:22+5:302021-07-02T04:05:22+5:30

औरंगाबाद : स्टार्टअपसाठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या जगातील शहरांची क्रमवारी ‘स्टार्टअप ब्लिंक’ने जाहीर केली असून जगातील पहिल्या हजार शहरांमध्ये औरंगाबादचा ...

Aurangabad's buzz in the world | औरंगाबादचा जगात गाजावाजा

औरंगाबादचा जगात गाजावाजा

googlenewsNext

औरंगाबाद : स्टार्टअपसाठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या जगातील शहरांची क्रमवारी ‘स्टार्टअप ब्लिंक’ने जाहीर केली असून जगातील पहिल्या हजार शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश असून हे शहर ८८५व्या क्रमांकावर आहे. या यादीत औरंगाबाद हे देशात ३६व्या, तर दक्षिण आशियामध्ये ४२व्या क्रमांकावर आहे. स्टार्टअप ब्लिंक ही संस्था जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीमविषयी माहिती संकलित करून दरवर्षी त्याबाबतचा अहवाल सादर करते. ‘स्टार्टअप ब्लिंक’ने नुकताच ‘स्टार्टअप इकोसिस्टीम वर्ल्ड रँकिंग २०२१’ हा अहवाल जाहीर केला असून जगातील पहिल्या एक हजार शहरांमध्ये औरंगाबादसह विषाखापट्टनम, विजयवाडा, रायपूर, पाटणा, वाराणसी, जमशेदपूर, उडपी या शहरांचा नव्यानेच समावेश झाला आहे. या यादीत दहाव्या क्रमांकावर बंगळुरू, १४व्या क्रमांकावर नवी दिल्ली, १६व्या क्रमांकावर मुंंबईचा क्रमांक आहे.

या अहवालात तीन पॅरॅमीटर्ससाठी गुणांकन देण्यात आले आहेत. यामध्ये मात्रा, गुणवत्ता आणि व्यवसाय वातावरण अशा तीन मापदंडांची बेरीज केली जाते. औरंगाबाद शहर मागील काही वर्षांत शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून पुढे आले आहे. स्थानिक औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून ‘मॅजिक’सारखी संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पुढाकाराने औरंगाबादेत इन्क्युबेशन सेंटर्सची उभारणी झाली आहे. यांच्या मदतीनेच औरंगाबादेत स्टार्टअप्स पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Aurangabad's buzz in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.