APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 01:12 PM2021-08-27T13:12:11+5:302021-08-27T13:16:26+5:30

औरंगाबादचा सुशांत मोदाणी गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने गेलेला आहे.

Aurangabad's Cricketer Sushant Modani who plays for APL to play one-day from USA! | APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार !

APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार !

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतच्या 'एपीएल' क्रिकेट स्पर्धेचा सामनावीर

- दिलीप सारडा

औरंगाबाद : सध्या अमेरिकेत राहत असलेला औरंगाबाद येथील उदयोन्मुख क्रिकेटपटू सुशांत जयचंद्र मोदाणी ( Sushant Modani) याची 'युएसए'च्या वनडे इंटरनॅशनल क्रिकेट ( USA Cricket ) संघात निवड झाली आहे. सुशांतने शहरात शालेय तसेच जिल्हास्तरीय क्रिकेट विश्वात जबरदस्त खेळ करून नावलौकिक मिळवला होता. तसेच सुशांतने लोकमतच्यावतीने आयोजित एपीएल क्रिकेट स्पर्धेत ( Lokmat APL ) सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. ( Aurangabad's Cricketer Sushant Modani who plays for APL to play one-day from USA!) 

गेल्या काही वर्षापासून सुशांत हा अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने गेलेला आहे. तेथेही वेगवेगळ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत चमक दाखवत अमेरिकन क्रिकेट विश्वातील दिग्गजांचे त्याने लक्ष वेधून घेतले. स्थानिक क्रिकेटमधील सुशांतच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत निवड समितीने अमेरिकेच्या वन-डे क्रिकेट संघात त्याला संधी दिली आहे. ओमान दौऱ्यावर जाणाऱ्या युएसच्या इंटरनॅशनल वन-डे संघात अंतिम १४ जणांमध्ये सुशांतची निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज अमेरिकेत करण्यात आली. या संघाचा येणाऱ्या सप्टेंबर मध्ये ओमानमध्ये दौरा होणार आहे.

लोकमतच्या 'एपीएल' क्रिकेट स्पर्धेचा सामनावीर
२०११ मध्ये लोकमत प्रस्तुत एपीएल क्रिकेट स्पर्धेत सुशांत मोदानीने शानदार कामगिरी केली होती. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून देत सामनावीराचा किताब पटकावला होता. यावेळी सामनावीर पुरस्कारासाठी लोकमतचे चीफ एडिटर तथा माजी मंत्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्या हस्ते त्याला नॅनो कार बक्षीस देण्यात आली होती. 

Web Title: Aurangabad's Cricketer Sushant Modani who plays for APL to play one-day from USA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.