विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:22 PM2022-09-16T13:22:58+5:302022-09-16T13:29:40+5:30

नोकरी, शिक्षणासाठी दरवर्षी अनेक औरंगाबादकर परदेशात जातात. परदेशात जाण्यापूर्वी अनेकजण आरटीओ कार्यालयातून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (आयडीपी) काढतात.

Aurangabad's 'driving' increased abroad; 'Tap Gear' for International Licensing | विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’ 

विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’ 

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात जाणाऱ्यांची संख्या रोडावली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (आयडीपी) काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव घटताच दोन वर्षांनंतर आता ‘आयडीपी’ काढणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या ८ महिन्यांतच दोनशे औरंगाबादकरांनी हे लायसन्स काढले आहे. दोन वर्षांनंतरची ‘आयडीपी’ची सर्वाधिक संख्या आहे.

नोकरी, शिक्षणासाठी दरवर्षी अनेक औरंगाबादकर परदेशात जातात. परदेशात जाण्यापूर्वी अनेकजण आरटीओ कार्यालयातून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (आयडीपी) काढतात. विना लायसन्स परदेशात वाहन चालविले तर, तेथील कायद्याच्या फेऱ्यात अडकण्याची भीती असते. औरंगाबादेत दरवर्षी किमान २०० नागरिक आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे ‘आयडीपी’ काढणाऱ्यांमध्ये २०२०मध्ये सुमारे घट झाली होती. कोरोनाच्या भीतीने परदेशात जाण्याचे बहुतांश जण टाळत होते.

२०२१मध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेकांनी परदेश दौरा सुरू केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचे प्रमाणात वाढ होत गेली. त्यात यावर्षी अवघ्या ८ महिन्यांतच १९८ नागरिकांनी परदेशात जाण्यापूर्वी ‘आयडीपी’ काढण्यावर भर दिला. एका दिवसात मिळते लायसन्स अर्ज केल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून एका दिवसात आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. अर्जासोबत पासपोर्ट, व्हिसा यासह येथील लायसन्सची प्रत असणे आवश्यक असते. सोबत वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडावे लागते. परदेशात विना लायसन्स वाहन चालविल्यास दंड तर होतोच, पण शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे अनेक जण हे लायसन्स काढण्यास प्राधान्य देतात. आंतरराष्ट्रीय 

लायसन्सची परिस्थिती वर्ष-संख्या
२०१८-२०३
२०१९-२१६
२०२०-५६
२०२१-११८
२०२२-१९८

एजंटांकडे जाण्याची गरज नाही
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक वर्षांची मुदत दिली जाते. कोरोना प्रादुर्भाव ओसरल्यानंतर आता हे लायसन्स काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आरटीओ कार्यालयात कागदोपत्री प्रक्रिया केल्यानंतर हे लायसन्स मिळते. या लायसन्ससाठी कोणत्याही मोटार ड्रायव्हिंग स्कूल अथवा एजंटांकडे जाण्याची गरज नाही.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Aurangabad's 'driving' increased abroad; 'Tap Gear' for International Licensing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.