औरंगाबादचे पासपोर्ट कार्यालय देशामध्ये ठरले पाचवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:12 AM2017-12-30T00:12:57+5:302017-12-30T00:13:02+5:30
पाडव्याला औरंगाबाद शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाली अन् अवघ्या दहा महिन्यांतच येथील केंद्र देशात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे.
साहेबराव हिवराळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पाडव्याला औरंगाबाद शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाली अन् अवघ्या दहा महिन्यांतच येथील केंद्र देशात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे.
नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील काही ठिकाणे जलदगतीने सेवा देत आहेत. यात औरंगाबादचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील राज्यातील तीन शहरे पोहोचली आहेत. कोल्हापूर, पिंप्री चिंचवड, औरंगाबाद ही शहरे देशातील सेंटरच्या तुलनेत पाचव्या स्थानावर आली आहेत, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.
देशात २५१ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, यातील पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या देशातील ५९ केंद्रांपैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत.
कोल्हापुरातून २१ हजार ९५
पासपोर्टचे वितरण
कोल्हापूर पासपोर्ट सेवाकेंद्रातून २१ हजार ९५ पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड पासपोर्ट वितरण केंद्रातून २० हजार ८३, तर औरंगाबाद केंद्रातून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूर तिसºया क्रमांकावर असून, या केंद्रातून १६ हजार ४४६ आणि चौथ्या क्रमांकावर असणाºया भुज (गुजरात) केंद्रातून १५ हजार २८१ पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती मुळे यांनी परिचय केंद्रास दिली.
कामे पेंडिंग ठेवली जात नसल्यानेच अग्रक्रम
पासपोर्ट तयार करण्याची तसेच वितरणाअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुंबईत व्हेरिफिकेशनसाठी टॅब्लेट देण्यात आले आहेत. लाभधारकांचे त्वरित व्हेरिफिकेशन होऊन ओळखीच्या व्यक्तीच्या माहितीवरून एका क्लिकवर माहिती कार्यालयात येते. त्यानुसार पासपोर्टची छपाई व इतर सोपस्कार त्वरित होतात. पेंडिंग ठेवले जात नसल्यानेच औरंगाबाद शहर पासपोर्ट वितरणमध्ये देशात पाचव्या क्रमांकावर आले आहे.
४इलाही तांबोळी, सावंत इत्यादी अधिकाºयांंनी स्थानिकला जलदकाम केले असून, हायटेक यंत्रणा औरंगाबादेतही राबविणार आहोत, असे पासपोर्ट कार्यालयाचे अधीक्षक उमेश देवारिया यांनी सांगितले.