औरंगाबादच्या खुशीची एनबीए शिबिरासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:46 IST2019-01-24T23:46:27+5:302019-01-24T23:46:35+5:30

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय प्रतिभावान बास्केटबॉल खेळाडू खुशी डोंगरे हिची एनबीएच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. एनबीएतर्फे अमेरिकेबाहेरील देशातील बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी विविध देशांत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते. हे शिबीर नवी दिल्ली येथे २१ ते २५ जानेवारीदरम्यान होत आहे.

Aurangabad's pleasure to be selected for NBA camp | औरंगाबादच्या खुशीची एनबीए शिबिरासाठी निवड

औरंगाबादच्या खुशीची एनबीए शिबिरासाठी निवड

औरंगाबाद : औरंगाबादची आंतरराष्ट्रीय प्रतिभावान बास्केटबॉल खेळाडू खुशी डोंगरे हिची एनबीएच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. एनबीएतर्फे अमेरिकेबाहेरील देशातील बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी विविध देशांत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते. हे शिबीर नवी दिल्ली येथे २१ ते २५ जानेवारीदरम्यान होत आहे. या शिबिरासाठी भारतातील २५ खेळाडूंची निवड झाली आहे. खेळाडूंना १९९६ च्या आॅलिम्पिक विजेत्या संघाची सदस्य जेनिफर आझी मार्गदर्शन करणार आहे. गतवर्षीदेखील खुशी डोंगरे हिची एनबीएच्या शिबिरासाठी निवड झाली होती. खुशी डोंगरे चॅम्पियन्स क्रीडा मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे व वडील संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या निवडीबद्दल जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संजय डोंगरे, अन्नवर सुत्तारी, सैफुद्दीन अब्बास, महेश आदत, ज्ञानेश्वर जगताप, अभय सोभावणे, शिवाजी शिंदे, खिमजी पटेल, संदीप सातदिवे, महेश इंगळे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Aurangabad's pleasure to be selected for NBA camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.