औरंगाबादचा सुदर्शन भारतात अव्वल (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:04 AM2021-02-27T04:04:41+5:302021-02-27T04:04:41+5:30
हे देदीप्यमान यश मिळविणारे सुदर्शन औरंगाबाद चाप्टरचे एकमेव विद्यार्थी आहेत. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना सुदर्शन म्हणाले की, २०१६ साली ...
हे देदीप्यमान यश मिळविणारे सुदर्शन औरंगाबाद चाप्टरचे एकमेव विद्यार्थी आहेत. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना सुदर्शन म्हणाले की, २०१६ साली सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सीएस करण्याचे ठरविले. दरम्यान, त्यांनी काम करण्याचा अनुभवही घेतला; पण त्यानंतर पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कोरोनामुळे मिळालेली सक्तीची रजा वरदान ठरली आणि त्यामुळेच जोमाने अभ्यास करून हे यश मिळवू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुदर्शन हे गुरू तेगबहादूर शाळेचे विद्यार्थी असून त्यांनी देवगिरी महाविद्यालयातून बी.कॉम., तर सरस्वती भुवन महाविद्यालयातून एम. कॉम. पूर्ण केले. सीए, सीएस या दोन्ही अभ्यासक्रमांचे सर्व टप्पे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केले आहेत.
औरंगाबाद चाप्टरचे चेअरमन परेश देशपांडे यांनी सांगितले की, मराठवाडा विभागात एकूण ५१ विद्यार्थी प्रोफेशनल प्रोग्राममध्ये, तर १३३ विद्यार्थी एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद चाप्टरतर्फे औरंगाबादसह जालना, अहमदनगर, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यांतही परीक्षा घेतली जाते.
सुदर्शन यांच्यासह झोया हिराणी, अमृता कुलकर्णी, अंजली बुधानी, जयंत निकम, काजल अग्रवाल, मिनवीत कौर बग्गा, पूनम तापडिया, विशाल नरोटे, अक्षय चांगेदे, संदीप शर्मा या विद्यार्थ्यांनीही परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.