औरंगाबादेत पत्नीचा खून; पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:19 AM2018-01-28T00:19:12+5:302018-01-28T00:19:18+5:30

दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाºया पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Aurangabad's wife's murder; Husband's suicide | औरंगाबादेत पत्नीचा खून; पतीची आत्महत्या

औरंगाबादेत पत्नीचा खून; पतीची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देसिडको वाळूज महानगर : दारूच्या व्यसनामुळे पत्नी भांडते म्हणून सुखी संसाराचा घोटला गळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाºया पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
प्रवीण प्रभाकर पाटील (३२) आणि आरती प्रवीण पाटील (२६, दोघेही रा. गुरुदक्षिणा अपार्टमेंट, सिडको वाळूज), अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रवीण हा एका खाजगी कंपनीत काम करायचा, तर आरती ही गृहिणी होती. त्यांना ९ वर्षे आणि दीड वर्षाची दोन मुले आहेत. प्रवीण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्येच त्याचे सासू-सासरे, भाऊ हे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहत.
प्रवीण अधूनमधून मद्य प्राशन करीत होता. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत. तीन दिवसांपूर्वी प्रवीण पुन्हा मद्य प्राशन करून आला होता. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि आरती रागाच्या भरात खालच्या मजल्यावर राहणाºया माहेरी दोन मुलांसह राहण्यास गेली. त्याचा प्रवीणला राग आला होता. पुन्हा मद्य न पिण्याचे वचन प्रवीणने शुक्रवारी पत्नी आणि सासू-सासºयांना दिले. त्यानंतर रात्री या दाम्पत्याने आरतीच्या माहेरीच जेवण केले आणि मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आरती दोन मुलांना सोबत घेऊन प्रवीणसोबत वरच्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेली.
समोरच्या हॉलमध्ये प्रवीणचे वडील, तर त्यांच्या बेडरूमध्ये दोन मुले झोपली होती. मध्यरात्रीनंतर प्रवीणने आरतीचा गळा आवळून खून केला, नंतर त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी ६.३० ते ७.०० वाजेच्या सुमारास मोठ्या मुलाच्या शाळेची वेळ झाली तरी कोणीही झोपेतून उठले नाही, म्हणून प्रवीणचे वडील हॉलमधून आत गेले तेव्हा त्यांना प्रवीणने गळफास घेतल्याचे दिसले. यावेळी खालच्या मजल्यावर जाऊन प्रवीणचा भाऊ आणि सासू-सासºयांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता आरती हिचा गळा घोटलेला दिसला. या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
नातेवाईक एकाच अपार्टमेंटमध्ये
मयत प्रवीण पाटील हे मूळचे नायगाव-किनगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथील रहिवासी आहे. बारा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह आरतीसोबत झाला. त्यानंतर त्यांनी त्यांचा लहान भाऊ विशालचा पत्नीच्या लहान बहिणीसोबत विवाह लावला. सर्व कुटुंब जवळ असावे, याकरिता सासू-सासरे यांच्या सांगण्यावरून मृत प्रवीण पाटील दाम्पत्य आणि त्यांचा भाऊ, भावजयी आणि सासू-सासरे एकाच अपार्टमेंटमध्ये भाड्याने स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहत.
अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर मृत दाम्पत्य चिमुकल्यासह राहत होते. दुसºया मजल्यावर विशाल आणि त्याची पत्नी तर तळमजल्यावर प्रवीण पाटील यांचे सासू-सासरे व इतर नातेवाईकही वास्तव्यास आहेत. शिवाय याच अपार्टमेंटजवळ प्रवीण यांची सर्वात लहान विवाहित साली राहत आहे.
चिमुकले झाले अनाथ
प्रवीण पाटील व आरती पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे दोन चिमुकले अनाथ झाले आहेत. मोठा मुलगा साहिल हा इयत्ता दुसºया वर्गात शिक्षण घेत असून, लहानगा दोन वर्षांचा रुद्र हा घरीच असतो. या घटनेमुळे दोघे चिमुकले अनाथ झाले.

Web Title: Aurangabad's wife's murder; Husband's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.