औरंगाबादेत रसिकांना भावणारे चित्रप्रदर्शन ‘काहीपण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:44 PM2018-02-10T23:44:58+5:302018-02-10T23:45:05+5:30
मॉडर्न आर्ट, निसर्गचित्रे, फु ले यांच्यासोबत अंतरंगातल्या विविध भावभावना चित्रांच्या माध्यमातून दर्शवणारे चित्रप्रदर्शन रसिकांना मोहित करीत आहे. दि.१० फेब्रुवारी रोजी स. ११ वा. एमजीएम परिसरातील कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये ‘अनटायटल्ड आणि काहीपण’ या दोनदिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यादरम्यान हरीश दहिहंडे आणि श्रुती दहिहंडे यांच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कुुंचल्यातून साकारलेली चित्रे कलाप्रेमींना भावणारी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॉडर्न आर्ट, निसर्गचित्रे, फु ले यांच्यासोबत अंतरंगातल्या विविध भावभावना चित्रांच्या माध्यमातून दर्शवणारे चित्रप्रदर्शन रसिकांना मोहित करीत आहे. दि.१० फेब्रुवारी रोजी स. ११ वा. एमजीएम परिसरातील कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये ‘अनटायटल्ड आणि काहीपण’ या दोनदिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यादरम्यान हरीश दहिहंडे आणि श्रुती दहिहंडे यांच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कुुंचल्यातून साकारलेली चित्रे कलाप्रेमींना भावणारी ठरली.
६ ते ४० वयोगटातल्या १५ कलावंतांची एकू ण ३८ चित्रे या चित्रप्रदर्शनात पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने अॅक्रॅलिक, टेक्स्चर आणि कॅनव्हास यांचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक चित्र अतिशय बोलके असून, काहीना काही सुप्त संदेश देणारे आहे. हरीश आणि श्रुती यांच्या मार्गदर्शनाखाली आरव सांघानेरीया, अस्मिता जगदाळे, आस्था खंडेलवाल, देवांग दहिहंडे, इशानी कुलकर्णी, मल्हार मुळे, मंजिरी कुलकर्णी, मारिया नोमी, मुग्धा निकाळजे, नीना निकाळजे, पृथ्वीराज देवडा, राहुल सुल्ताने, सौरभ लताडे, शुभम कागलीवाल, तेजस्विनी खेडकर या कलावंतांनी रेखाटलेली चित्रे यादरम्यान पाहायला मिळतात.
रविवार, दि. ११ रोजी स. ११ ते सायं. ८ यावेळेत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, कलाप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
निसर्गचित्रांपासून ते व्यक्तिचित्रांपर्यंतचे सर्वच प्रकार या प्रदर्शनात पाहावयास मिळतात. यामधील टेक्स्चर पेंटिंग हा प्रकारही कलेचा उत्तम नमुना आहे. यामध्ये सुतळी, दोरी, कागद व कापड, असे विविध प्रकार वापरून तयार केलेली नक्षी अगोदर कॅन्व्हासवर चिकटवली जाते आणि नंतर तिच्यावर रंगकाम केले जाते. हा प्रकार अवघड असून, यासाठी जास्त वेळ लागत असल्याचे कलाकारांनी सांगितले. कलाकारांनी या प्रदर्शनासाठी मागील दोन-तीन महिन्यांपासून घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत प्रत्येक चित्राच्या वेगळेपणातून दिसून येते.