जिल्ह्यात खरिपाची सरासरी १०९ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:00 AM2017-07-24T00:00:52+5:302017-07-24T00:02:56+5:30

बीड : मागील चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे.

The average annual cultivation of Kharipi in the district is 9.9% | जिल्ह्यात खरिपाची सरासरी १०९ टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपाची सरासरी १०९ टक्के पेरणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे. बीड जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत १०९. ५४ टक्के पेरणी झाली आहे. बीड आणि गेवराई तालुक्यात कापसाची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. जिल्ह्यात बाजरी, तूर, उडीद, मुगाची सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्यात झाली आहे.
बीड जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० इतके आहे. यंदा ७ लाख २१ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला असून, कृषी विभागाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत १०९.५४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बीड तालुक्यात ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. तर ११ हजार ४१५ हेक्टरात सोयाबीन व ११ हजार ६०८ हेक्टरात बाजरीचा पेरा झाला आहे. तर गेवराई तालुक्यात ६९ हजार ८५६ हेक्टरात कापसाची लागवड झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरीला पसंती दिली आहे.
जिल्ह्यात उडीदाची सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्यात २३ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. या शिवाय १५ हजार ५२० हेक्टर क्षेत्रात बाजरी, ७३६४ हेक्टर क्षेत्रात तुर तर ७ हजार ७२७ हेक्टरात मुगाची पेरणी केली आहे. आष्टी तालुक्यातील हे आकडे इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. शिरूर कासार तालुक्यात २९ हजार १९२ हेक्टरमध्ये कापसाचा, २३४९ हेक्टरमध्ये सोयाबीन, २८८६ हेक्टरमध्ये तुरीचा तर ९१३१ हेक्टरात बाजरीचा पेरा झाला आहे. माजलगाव तालुक्यातही शेतकऱ्यांनी कापसालाच पसंती दिली असून, ३५ हजार ७४४ हेक्टरमध्ये पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ २० हजार ४९६ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा आहे.
गेवराई तालुक्यात कापसानंतर सोयाबीनचे क्षेत्र ६६५४ इतके आहे. धारुर तालुक्यातही २३ हजार ६५० हेक्टर कापसाचा पेरा झाला आहे. त्या पाठोपाठ ७ हजार ४६५ हेक्टरात सोयाबीनचा पेरा आहे. वडवणी तालुक्यात कापसाचा २२ हजार १०० हेक्टरात पेरा झाला असून, बाजरी, तूर, सोयाबीनचे पिकही शेतकऱ्यांनी घेतले आहे. अंबाजोगाई तालुक्यात सोयाबीनशिवाय शेतकऱ्यांनी कापूस, तूर, खरीप ज्वारीला प्राधान्य दिले आहे. केज तालुक्यात ३९ हजार हेक्टरवर कापूस, तर ३५ हजार ७५० हेक्टरात सोयाबीनचा पेरा आहे.
परळी तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र २६ हजार ७७ हेक्टर असून, १९ हजार ४६८ हेक्टरात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे.

Web Title: The average annual cultivation of Kharipi in the district is 9.9%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.