दारु दुकानाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:46 AM2017-11-08T00:46:38+5:302017-11-08T00:46:45+5:30
दीपनगर भागात मुख्य रस्त्यावर यापूर्वी असलेल्या बिअर बारमुळे या भागातील महिला आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्या ठिकाणी आता देशी दारुचे दुकान उघडण्यात येणार असल्याचा फलक लावण्यात आला, त्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी सकाळी या दुकानाला टाळे ठोकले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: दीपनगर भागात मुख्य रस्त्यावर यापूर्वी असलेल्या बिअर बारमुळे या भागातील महिला आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्या ठिकाणी आता देशी दारुचे दुकान उघडण्यात येणार असल्याचा फलक लावण्यात आला, त्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी सकाळी या दुकानाला टाळे ठोकले़ तसेच या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली़
पूर्णा रोड कॉर्नरवर यापूर्वी बिअर बार होते़ बारमध्ये येणाºया मद्यपींमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते़ त्यात ३० सप्टेंबर रोजी या ठिकाणी देशी दारुच्या दुकानाचा फलक लावण्यात आला़ याच रस्त्यावरुन नंदकिशोरनगर, दीपनगर, बजाजनगर, धन्वंतरी कॉलनी, भगीरथनगर या भागातील ८ ते १० हजार नागरिकांना ये-जा करावे लागते़ या वस्त्यांमधील उच्चशिक्षित, विद्यार्थी, तरुणी यांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते़ पहाटे ४ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत भाजीपाल्याचा बाजारही सुरु असतो़ त्यामुळे या ठिकाणी देशी दारुचे दुकान सुरु झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून महिला आणि तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे़ याबाबत रहिवाशांनी १० फेब्रुवारी २०१५ रोजी नागरिकांनी वैयक्तिक अर्जही सादर केले आहेत़ त्यामुळे या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ परंतु याबाबत अद्याप प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली नसल्यामुळे संतप्त महिलांनी आज या दुकानाला टाळे ठोकले़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़