चौकशीसाठी सहा महिन्यांपासून टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:03 AM2021-04-03T04:03:56+5:302021-04-03T04:03:56+5:30
पुरवठा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे दुकानदारांची लूट करतात. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ...
पुरवठा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे दुकानदारांची लूट करतात. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. मात्र, सहा महिने उलटूनही या निवेदनाची दखल न घेता संबंधितांना अभय दिले जात आहे. पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वस्त धान्य दुकानदारांकडून वेगवेगळ्या नावाखाली दर महिन्याला पैसे जमा करतात. पैसे वसुलीसाठी खासगी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली असून गैरव्यवहार समोर येऊ नये यासाठी विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले आहेत. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काही दुकानदारांना कमी व काहींना जास्त शिधापत्रिका जोडल्या असल्याची तक्रार आहे. वारंवार तक्रारी करूनसुद्धा संबंधितांवर कारवाई होत नसल्याने कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.