अनावश्यक तपासण्या टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:57 AM2017-10-29T00:57:46+5:302017-10-29T00:57:55+5:30
अनावश्यक तपासण्या टाळून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आजाराचे निदान केले पाहिजे. यासंदर्भात रुग्णांनाही जागृत केले पाहिजे, असा सूर इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या परिषदेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आजाराच्या नावाखाली अनावश्यक तपासण्या करून काही जणांकडून रुग्णांची अक्षरशा: आर्थिक लूट केली जाते. परंतु अनावश्यक तपासण्या टाळून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आजाराचे निदान केले पाहिजे.
यासंदर्भात रुग्णांनाही जागृत केले पाहिजे, असा सूर इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या परिषदेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनअंतर्गत इंडियन कॉलेज आॅफ रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग आणि महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेला शनिवारी (दि.२८) सुरुवात झाली.
परिषदेत २५० पेक्षा अधिक रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला असून, पहिल्या दिवशी स्त्रियांमधील कर्करोग, गर्भपिशवीचे आजार, आधुनिक यंत्रसामुग्री आदी विषयांवर विचारमंथन झाले. परिषदेत नवी दिल्ली येथील डॉ. एल. उपरेती, डॉ. नताशा गुप्ता, डॉ. पलक पोपट, डॉ. वर प्रसाद, डॉ. अभंग आपटे, डॉ. विशाल कुमात यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. शैलेश कोरे, राज्य सचिव डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. अश्फाक मेमन, डॉ. इक्बाल मिन्ने, डॉ. शिल्पा सातारकर, डॉ. शुभांगी शेटकार आदी उपस्थित होते.