शिक्षिका मीरा टेके, नीलम सुंबे यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:02+5:302021-03-13T04:05:02+5:30
या स्पर्धेत १०७ महिला सहभागी झाल्या होत्या. राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकूण ४६ कर्तृत्ववान महिलांना या ...
या स्पर्धेत १०७ महिला सहभागी झाल्या होत्या.
राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकूण ४६ कर्तृत्ववान महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्रांत सणानिमित्ताने घेण्यात येत असलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमास फाटा देऊन सर्व स्तरातील विधवा महिलांचा साडीचोळी व तीळगूळ देऊन सन्मान करण्याचा उपक्रम टेके यांनी घेतला होता. प्राथमिक वर्गातच विद्यार्थी वयोगटास कला कार्यानुभव विषयातून व्यावसायिक शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी यादृष्टीने सुंबे यांनी सवंदगाव शाळेत दरवर्षी अनेक नवीन उपक्रम राबविले. या उपक्रमांची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. गटशिक्षणाधिकारी मनिष दिवेकर, केंद्रप्रमुख श्याम राजपूत, उत्तम पारखे, नारायण साळुंके, संजय गायकवाड, मुख्याध्यापक बालचंद चौधरी, गणेश पगारे यांनी शिक्षिका मीरा टेके, नीलम सुंबे यांचे अभिनंदन केले.
--- दोन फोटो