प्रकाश देशपांडे आणि सूचिता खल्लाळ यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:02 AM2021-02-07T04:02:17+5:302021-02-07T04:02:17+5:30
प्रा. देशपांडे यांनी मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी कवितेची गांभीर्याने समीक्षा केली असून, त्यांचे संत कविता, पंच कविता, शाहिरी कविता, ...
प्रा. देशपांडे यांनी मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी कवितेची गांभीर्याने समीक्षा केली असून, त्यांचे संत कविता, पंच कविता, शाहिरी कविता, आधुनिक कविता आणि समकालीन मराठी कविता हे पंचखंडात्मक लेखन कवितेच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचे संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरत आहेत. साहित्यातील त्यांचे लक्षणीय कार्य लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
नांदेड येथील कवयित्री सूचिता खल्लाळ शिक्षण खात्यात अधिकारी असून, समकालीन मराठी कवयित्रींमध्ये त्या चर्चेत आहेत.
या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे असून कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांचे वितरण होण्याची शक्यता आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, कथालेखक डॉ. आसाराम लोमटे, कवी प्रा. श्रीधर नांदेडकर यांचा समावेश होता.
फोटो ओळ :
प्रकाश देशपांडे व सूचिता खल्लाळ यांचा सिंगल कॉलम फोटो आहे.