‘आयएमए’ तर्फे जनजागृती शिबीर
By | Published: December 8, 2020 04:03 AM2020-12-08T04:03:33+5:302020-12-08T04:03:33+5:30
डेंग्यूचे प्रमाण यंदा घटले औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा डेंग्यूचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत केवळ ८ रुग्णांचे निदान ...
डेंग्यूचे प्रमाण
यंदा घटले
औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा डेंग्यूचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत केवळ ८ रुग्णांचे निदान झाले आहे. तर ग्रामीण भागात डिसेंबर महिन्यात आतापर्यंत एका रुग्णाचे निदान झाले आहे. गतवर्षी जिल्ह्यात विशेषत: शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला होता. त्यात रुग्णांचा मृत्यूही ओढवला होता. यावर्षी डेंग्यूची स्थिती नियंत्रणात आहे.
मालवाहतुकीसाठी ‘एसटी’चा स्वतंत्र कक्ष
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभागात मालवाहतुकीच्या कामकाजासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीच्या सेवेला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात ११०६ बसेसद्वारे मालवाहतूक केली जात आहे. स्वतंत्र कक्षामुळे ही सेवा आणखी वाढण्यास मदत होईल.
भाग्यनगरात कचऱ्याचे ढीग
औरंगाबाद : भाग्यनगरमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडून आहेत. याठिकाणी महापालिकेकडून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याची स्थिती आहे. कचरा उचलला जात नसल्याने तो जाळून नष्ट करण्याची वेळ येत आहे. या भागातील कचरा नियमितपणे उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
क्रांतीचौक उड्डाणपुलावर वाढले झाडेझुडपे
औरंगाबाद : क्रांतीचौक उड्डाणपुलावर झाडेझुडपे वाढले आहेत. त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील उड्डाणपुलांची स्वच्छता केली होती. परंतु, उड्डाणपुलावरील झाडेझुडपे तसेच आहेत. हे झाडेझुडपे काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.