शेतकऱ्यात जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:05 AM2021-06-26T04:05:58+5:302021-06-26T04:05:58+5:30
राज्य सरकारच्या आदेशानुसार २१ जून ते १ जुलैदरम्यान कृषी विभागाकडून नऊ दिवसाची कृषी संजीवनी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
राज्य सरकारच्या आदेशानुसार २१ जून ते १ जुलैदरम्यान कृषी विभागाकडून नऊ दिवसाची कृषी संजीवनी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा कालावधी नऊ दिवसांचा असून, या कार्यक्रमात नऊ विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. बाजारात जे विकते त्याच पिकाची लागवड करून उत्पादन घ्यावे जेणे करून शेतकऱ्याचा माल पडून राहणार नाही व तत्काळ चांगला भाव मिळू शकेल यासाठी जनजागृती केली जात आहे. मुर्शिदाबादवाडीत उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सदाशिव विटेकर, कृषी सहायक एच. एस. पाटीलसह शेतकरी उपस्थित होते.
-------- नऊ विषय ----------
रुंद वरंबा व सरी तंत्रज्ञान, बीज प्रकिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खताचा वापर करणे, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, दोन पिकातील उत्पादकता वाढविण्यासाठी रिसोर्स बँकेतील शेतकरी सहभाग, कीड व रोग नियंत्रणाच्या उपयोजना, कृषी दिन याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
---------------------------------------------------------