'मी जबाबदार मोहीमे'ची युवा सेनेतर्फे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 08:54 PM2021-02-26T20:54:03+5:302021-02-26T20:54:32+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी जबाबदार' ही मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे.
औरंगाबाद: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार पूर्व मतदारसंघात 'मी जबाबदार' या मोहीमेची जनजागृती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सेव्हन हिल येथे पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मास्कचे वाटप केले. या उपक्रमाचे आयोजन युवासेनेचे उपजिल्हाधिकारी गणेश तेलोरे यांनी केली होते.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी जबाबदार' ही मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात जनजागृती केली. शहरातील सेव्हन येथे पदाशिकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्यांना मास्क वाटप केले. तसेच त्यांना त्यांना हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले . यावेळी मच्छिंद्र देवकर, अरविंद कामतीकर, अनिल बर्डे, समी आढाव, गोपाल भागवत, अक्षय दातार, जयराज भसाडे, उमंग सिदलींग, नितील मोहीते, शिवकुमार देशमुख, अक्षय घोडके आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.