गल्ले बोरगावात पोलिसांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:12+5:302021-07-10T04:04:12+5:30
नागरिकांनी बाहेरगावी जाताना घराला कुलूप न लावता विश्वासू माणूस घरी ठेवावा. मौल्यवान दागिने, नगदी पैसे घरी न ठेवता बँकेत ...
नागरिकांनी बाहेरगावी जाताना घराला कुलूप न लावता विश्वासू माणूस घरी ठेवावा. मौल्यवान दागिने, नगदी पैसे घरी न ठेवता बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, सीसीटीव्ही लावावेत, बाहेरगावी जाताना आपला संपर्क क्रमांक शेजारी किंवा पोलीस स्टेशनला देऊन जावा. कुलूप लावण्याचे कामच पडले, तर मजबूत कुलूप शक्यतो सेंटर लॉक लावावे, शक्य झाल्यास चौकीदार ठेवावा आदी सूचना नागरिकांना पोलिसांनी दिल्या.
यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे एस. डी. काळे, आर. डी. धापसे, एन. सी. शेख, आर. एस. काळे, बीट जमादार रमेश भिसे, पोलीस पाटील सिंधुताई बढे, सरपंच विशाल खोसरे, चेअरमन तुकाराम हारदे, व्हाईस चेअरमन दिलीप बेडवाल, संतोष राजपूत, राजेंद्र बढे, नंदू बुखार, तुषार खोसरे, बाबासाहेब वीर, जावेद शेख, धनंजय भागवत आदी उपस्थित होते.
090721\1713-img-20210709-wa0019.jpg
घरफोडी टाळण्यासाठी गल्ले बोरगावत पोलिसांची जनजागृती मोहीम