भयंकरच ! २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात १,७१५ नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:05 AM2021-03-28T04:05:37+5:302021-03-28T04:05:37+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी २४ तासांत उच्चांकी २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जिल्ह्यातील २८ आणि अन्य ...

Awful! Death of 29 corona patients, increase of 1,715 new patients in the district | भयंकरच ! २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात १,७१५ नव्या रुग्णांची वाढ

भयंकरच ! २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात १,७१५ नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी २४ तासांत उच्चांकी २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जिल्ह्यातील २८ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात १,७१५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,०६०जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या १५,५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७७ हजार ३५० झाली आहे, तर आतापर्यंत ६० हजार २२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,५५९ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,७१५ रुग्णांत मनपा हद्दीतील १,२५७, तर ग्रामीण ४५८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९०० आणि ग्रामीण १६०, अशा १,०६० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना पीरबावाडा, फुलंब्री येथील ३२ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडीतील ८० वर्षीय पुरुष, औरंगपुऱ्यातील ६३ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय पुरुष, कबीरनगर, उस्मानपुरा येथील ६० वर्षीय महिला, बोरगाव कासरी, सिल्लोड येथील ३० वर्षीय पुरुष, चापानेर, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ७० वर्षीय महिला, चित्तेपिंपळगाव येथील ७८ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ५८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, कन्नड येथील ७५ वर्षीय महिला, गारखेड्यातील ५५ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ७६ वर्षीय महिला, सवितानगर येथील ५८ वर्षीय पुरुष, पंढरपूर, वाळूज येतील ६४ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ६५ वर्षीय पुरुष, एकनाथनगर, उस्मानपुरा येथील ७० वर्षीय पुरुष, एन-२ येथील ६९ वर्षीय महिला, देशमुखनगरातील ७४ वर्षीय महिला, समतानगर, कांचनवाडी येथी ६३ वर्षीय पुरुष, एन-११, मयूरनगरातील ६२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ६६ वर्षीय पुरुष, अजबनगर येथील ८१ वर्षीय पुरुष, एन-२ येथील ६९ वर्षीय महिला, एन-१, जलधरा काॅलनीतील ६२ वर्षीय महिला, न्यू श्रेयनगर येथील ७९ वर्षीय पुरुष, साईनगर, एन-६ येथील ७० वर्षीय पुरुष, मयूरपार्क, एन-११ येथील ५३ वर्षीय पुरुष आणि परभणी जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद १५, बीड बायपास २४, सातारा परिसर २७, गारखेडा परिसर २३, चिकलठाणा ७, शिवाजीनगर १२, म्हाडा सिडको २, शहागंज १, बजरंग चौक २, पदमपुरा ९, कांचनवाडी १४, ज्योतीनगर ९, खडकेश्वर १, सहकारनगर ३, सारा परिसर १, साक्षीनगर २, चेतक घोड्याजवळ १, मातोश्रीनगर १, कैलासनगर २, मोतीलालनगर १, एन-२ येथे १८, न्यू शांतिनिकेतन कॉलनी २, जाधववाडी ४, झांबड इस्टेट १, एन-१ येथे ६, बालाजीनगर ५, टाऊन सेंटर ६, जालना रोड १, पैठण गेट ३, एन-८ येथे १३ , एन-१३ येथे १, नागेश्वरवाडी ३, औरंगपुरा ४, पिसादेवी रोड १, नारळीबाग १, वानखेडेनगर २, समर्थनगर ७, उदय कॉलनी ३, एशियन हॉस्पिटल ८, दशमेशनगर २, शहानूरवाडी ६, नूतन कॉलनी ३, उल्कानगरी ५, सूतगिरणी चौक ५, बन्सीलालनगर ९, दर्गा रोड १, प्रतापनगर ६, आकाशवाणी २, गुरू रामदासनगर १, जहागीरदार कॉलनी १, नाथपुरम १, गरम पाणी १, रचनाकार कॉलनी २, जयनगर १, ईटखेडा ४, गांधीनगर ३, पडेगाव ७, जालाननगर ५, पवननगर हडको ३, उस्मानपुरा ७, अजबनगर २, पगारिया निवास १, चिंतामणी कॉलनी १, अक्षय सप्तक अपार्टमेंट १, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी १, न्यू उस्मानपुरा २, महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी १, मोतीकारंजा चौक १, भावसिंगपुरा १, एन-४ येथे ७, फाजलपुरा १, क्रांती चौक २, दिशा घरकुल देवळाई रोड ४, शिवकृपा अपार्टमेंट २, सादतनगर १, न्यू श्रेयनगर १, विद्यापीठ परिसर ३, पुंडलिकनगर ७, दिशानगरी २, म्हाडा कॉलनी १, म्हाडा कॉलनी, देवळाई २, छत्रपतीनगर ५, कासलीवाल मार्वल २, श्रीहरी पार्क १, सप्तशृंगी अपार्टमेंट १, जयभवानीनगर ६, मुकुंदवाडी ८, हनुमाननगर ७, रामनगर २, ठाकरेनगर २, देवगिरी कॉलनी २, कासलीवाल पार्क १, न्यू हनुमाननगर ३, शिवनेरी कॉलनी १, विठ्ठलनगर १, देवानगरी ४, दिशा संकुल ३, विवेकनगर १, एन-५ येथे ७, सरस्वतीनगर २, मल्हार चौक १, गजानननगर ३, विष्णूनगर १, सिंधी कॉलनी ८, विजयनगर ५, गुरुदत्तनगर २, ज्ञानेश्वरनगर १, प्राइड औरंगाबाद १, चैतन्यनगर २, शिवशंकर कॉलनी २, अरुणानगर १, परिमल हाऊसिंग सोसायटी २, जवाहरनगर १, रेणुकानगर १, श्रीरामनगर १, मित्रनगर १, विनायकनगर १, रेल्वेस्टेशन २, स्वप्ननगरी १, मिटमिटा १, एन-३ येथे २, श्रीनिकेतन कॉलनी १, परिजातनगर १, लक्ष्मी कॉलनी १, सेवन हिल १, देवनगर साईकृपा १, एन-११ येथे ५, एन-७ येथे ८, एन-९ येथे १४, हर्सूल ३, सिडको ७, हडको १, एन-१२ येथे ४, टी.व्ही.सेंटर ४, म्हाडा कॉलनी ५, प्रकाशनगर १, सुभाषचंद्र बोसनगर १, रंजनवन सोसायटी एम-२ येथे १, मयूरपार्क १२, संकल्पनगर ३, सुदर्शननगर ४, नवजीवन कॉलनी ९, भगतसिंगनगर २, हिरानगर १, स्वामी विवेकानंदनगर ३, हर्सूल, पिसादेवी रोड १, मोतीनगर १, श्रीकृष्णनगर २, श्रीपाद कॉलनी १, कबाडीपुरा बुढी लेन १, व्हीआयपी रोड १, न्यू विष्णूनगर २, उत्तरानगरी २, वसंतनगर १, एन-६ येथे ७, कैलाशनगर १, संजयनगर १, नाथनगर १, जुना मोंढा १, जवाहर कॉलनी २, देशमुखनगर १, अद्वैत रेसिडेन्सी २, नाईकनगर २, समतानगर १, जटवाडा रोड १, होनाजीनगर १, अजित सिड्स १, नक्षत्रवाडी १, पुष्पनगरी १, गजानन मंदिर १, आशानगर ३, ज्युबिली पार्क १, राजनगर २, प्रभातनगर १, चौराहा १, जाकेरनगर १, वेदांतनगर ३, गुरू तेग बहादूर स्कूल १, श्रेयनगर २, अरिहंतनगर २, बजाज हॉस्पिटल १, एकनाथनगर ४, बसैयेनगर ५, स्टेशन रोड १, भानुदासनगर १, विश्वजीत सोसायटी १, गादिया विहार १, विश्वेश्वर सोसायटी १, राहुलनगर १, संभाजी कॉलनी १, अयोध्यानगर १, सातारा कॉलनी १, घाटी ३, कटकट गेट १, देवगण व्हॅली १, नंदनवन कॉलनी १, पहाडसिंगपुरा १, शहानूरमिया दर्गा १, आदर्शनगर १, रामकृपा कॉलनी १, फॉरेस्ट कॉलनी २, पेठेनगर १, खाराकुंआ १, अन्य ६११.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाननगर १९, पोकळी वैजापूर १, एमआयडीसी, औरंगाबाद १, बालानगर १, खुलताबाद १, वाळूज महानगर ७, वडगाव कोल्हाटी १०, गंगापूर १, बिडकीन १, विशालनगर १, रोशन हाऊसिंग सोसायटी १, सुलतानपूर १, पिसादेवी ५, हर्सूल गाव ३, सावंगी हर्सूल १, कन्नड २, आळंद १, वाळूज एमआयडीसी २, साऊथ सिटी ५, म्हाडा कॉलनी तिसगाव २, सिडको वाळूज महानगर ८, साईनगर १, रांजणगाव शेणपुंजी २, देवगिरीनगर एमआयडीसी सिडको १, माळीवाडा १, रिसोड १, आडगाव सरग १, खंडाळा, वैजापूर १, कापूसवाडी १, कासोद १, बोरसर १, आडगाव जावळे १, अन्य ३७२.

Web Title: Awful! Death of 29 corona patients, increase of 1,715 new patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.