छत्रपती संभाजीनगर भोवतालच्या जंगलावर कुऱ्हाड; आळा घातला नाही तर वाळवंटाकडे वाटचाल!

By साहेबराव हिवराळे | Published: March 21, 2023 04:11 PM2023-03-21T16:11:29+5:302023-03-21T16:12:11+5:30

जागतिक वन दिन: दरवर्षी वृक्षारोपण चळवळ राबविली जाते, वृक्षदिंडी काढून रोपे लावली जातात अन् पाठ फिरवली की, जळतणासाठी लाकडावर ‘कुऱ्हाडी’चे घाव घातले जातात.

Ax on the forest around Chhatrapati Sambhajinagar; If not stopped, we will move towards the desert! | छत्रपती संभाजीनगर भोवतालच्या जंगलावर कुऱ्हाड; आळा घातला नाही तर वाळवंटाकडे वाटचाल!

छत्रपती संभाजीनगर भोवतालच्या जंगलावर कुऱ्हाड; आळा घातला नाही तर वाळवंटाकडे वाटचाल!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरभोवताली सारोळा, सातारा, देवळाई, नक्षत्रवाडी डोंगरावरच्या झाडांची कत्तल वाढली आहे. वाळलेल्या लाकडाऐवजी ‘वृक्षारोपण’ केलेल्या झाडावरच कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहेत. याला आळा घातला नाही तर हे वनक्षेत्र वाळवंटात बदलण्याची शक्य आहे. त्याकडे जागतिक वन दिनानिमित्त वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

जंगलाचे काही पैलू असे आहेत की, ‘दृष्टीआड सृष्टी’ असे आपण नेहमीच ऐकत असतो; पण या सृष्टीच्या आड काय आहे, जे आपल्याला दिसत नाही. अशा कितीतरी गोष्टी या सृष्टीची चक्रे फिरवत असतात. या सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडत असतो. त्याचप्रमाणे यांच्या पूरक वापराने एकूणच जीवसृष्टीचे संवर्धनही होत असते, असे वन्यजीव मानद सदस्य डाॅ. किशोर पाठक यांनी सांगितले.

वृक्ष लागवडीनंतर सर्रास वृक्षतोड
दरवर्षी वृक्षारोपण चळवळ राबविली जाते, वृक्षदिंडी काढून रोपे लावली जातात अन् पाठ फिरवली की, जळतणासाठी लाकडावर ‘कुऱ्हाडी’चे घाव घातले जातात. सारोळा वनक्षेत्रातील नागरिकांना गॅस व शेगडीचे वितरण करण्यात आलेले आहे. तरीही वनक्षेत्रात वाळलेल्या लाकडाऐवजी वृक्षारोपण केलेली वृक्षतोडही सर्रास सुरू आहे.

बंदी; तरी जंगलात शिरकाव
हिंस्त्र वन्य जीवांकडून पाळीव जनावर तसेच गो पालकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून वनक्षेत्रात जाण्यास बंदी आहे. परंतु त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने कुरण कापून नेण्याऐवजी जनावरे सोडली जातात आणि कुऱ्हाडीचे घाव घालून वृक्षतोड होते. कुणीही अडवत नाही.

शहरातही झाडांचे घोटले गळे..
शहरात वृक्षारोपण केले जाते; परंतु त्याला कुंपण म्हणून लावलेल्या जाळ्या काढण्याचा विसर पडतो. मनपाचे पथकही लक्ष देत नाही. त्यामुळे शहरातील वृक्षांचे गळे घोटण्याचे प्रकार बहुतांश ठिकाणी दिसतात.

पथके सक्रिय
वनविभागाने वृक्षारोपण व अतिक्रमण रोखण्यासाठी पथके तयार केली असून, ध्वनिचित्रमुद्रण करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Ax on the forest around Chhatrapati Sambhajinagar; If not stopped, we will move towards the desert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.