अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:31 PM2018-11-24T23:31:49+5:302018-11-24T23:32:16+5:30
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.
औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.
मनसेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २७ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत पैठणगेटहून विभागीय आयुक्त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, शेख राज शेख, बालाजी मुंढे, सचिन पाटील, गजानन गिते, बळीराम खटके, बिपीन नाईक, वैभव मिटकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
जावेद शेख म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, परंतु त्यासंदर्भात काहीही नियोजन केलेले नाही. दुष्काळावरून लक्ष हटविण्याचाच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी दंडुका मोर्चा काढण्यात येत आहे. सध्या फक्त इशारा देण्यासाठी दंडुका हातात घेतला जात आहे. त्यानंतरही दुर्लक्ष केले तर दंडुका वापरावा लागेल. मोर्चामध्ये मराठवाड्यातून शेतकºयांसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. मुंबईहूनदेखील मनसेचे नेते सहभागी होतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी गौतम आमराव, आशिष सुरडकर, प्रवीण मोहिते, संकेत शेटे, किशोर पांडे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.
प्रत्येक निवडणुकीत मुद्दा
एकीकडे गावांमध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत, तर त्याच गावात सीएम चषक खेळले जात आहे, असे सुमित खांबेकर म्हणाले. जावेद शेख म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे, परंतु निवडणुकीनंतर. चार वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा शिवसेनेला आठवला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हाच मुद्दा पुढे केला जातो.
-----------