पर्यटन राजधानीत आयुर्वेदाचे ‘एम्स’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:03 PM2021-10-04T13:03:51+5:302021-10-04T13:08:20+5:30

Bhagwat Karad News : शहरात दिल्लीच्या धर्तीवर आयुर्वेद ‘एम्स’ करण्यासाठी प्रयत्न करणार

Ayurveda's 'AIIMS' in tourism capital Aurangabad; Union Minister Bhagwat Karad's assurance | पर्यटन राजधानीत आयुर्वेदाचे ‘एम्स’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे आश्वासन

पर्यटन राजधानीत आयुर्वेदाचे ‘एम्स’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे आश्वासन

googlenewsNext
ठळक मुद्देआयुर्वेद व्यासपीठातर्फे कोविड योद्धांचा सन्मान

औरंगाबाद : औरंगाबाद हे शहर पर्यटनाची राजधानी आहे. येथे आयुर्वेद ‘एम्स’ ( AIIMS ) व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) म्हणाले. आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीने रविवारी आयोजित कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ( Ayurveda's 'AIIMS' in tourism capital Aurangabad) 

समर्थनगर येथील आयएमए हाॅल येथे आयुर्वेद व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रारंभी डॉ. भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या आयुर्वेद चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका डाॅक्टर्स, विविध महाविद्यालयांतील अध्यापकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे, डाॅ. श्रीकांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, डाॅ. सुभाष भोयर, वैद्य आनंद कट्टी उपस्थित होते. यावेळी आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य संतोष नेवपूरकर यांनी मागणी केली की, आपल्या शहरात दिल्लीच्या धर्तीवर आयुर्वेद ‘एम्स’ व्हावे. जेणेकरून संशोधनासह सर्व गोष्टींना चालना मिळेल.

पहिलेच अपत्य, पण मुलगा की मुलगी अजूनही कळेना !

प्रास्ताविक वैद्य सोहन पाठक यांनी केले. सूत्रसंचालन वैद्य परेश देशमुख यांनी केले. वैद्य संदीप औटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्य रवी बोर्डे, भैरव कुलकर्णी, विनय सेवलीकर, पंकज मुळे, प्रदीप पाटील, अतुल मुरुगकर, आरती कुरील यांनी प्रयत्न केले.
 

Web Title: Ayurveda's 'AIIMS' in tourism capital Aurangabad; Union Minister Bhagwat Karad's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.