जालना शहरात होणार आयुर्वेदिक रुग्णालय
By Admin | Published: June 18, 2017 12:46 AM2017-06-18T00:46:54+5:302017-06-18T00:47:24+5:30
जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात ३० खाटांचे सुसज्ज असे आयुर्वेदिक रूग्णालय होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात ३० खाटांचे सुसज्ज असे आयुर्वेदिक रूग्णालय होणार आहे. यामुळे जिल्हावासियांना आता शासकीय रूग्णालयात आयुर्वेदिक उपचार मिळणार आहेत. आयुर्वेदिक उपचारास प्राचीन परंपरा असल्यामुळे हे रूग्णालय महत्वाचे ठरणार आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या जागेत ही रूग्णलाय होणार असून, यासंबंधीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाने ईमेलद्वारे आयुर्वेदिक हॉस्पिटलबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार जिल्हा रूग्णालयात असलेल्या जागेची माहिती संकलित करून तसेच आवश्यक त्या बाबींची माहिती शासनाला कळविण्यात येणार आहे. जिल्हा रूग्णालयातील आयुष विभागामार्फत आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथिक उपचार केले जातात. मात्र काही वर्षांत आयुर्वेदिक उपचाराकडे वाढलेला कल लक्षात घेता सदर सुसज्ज असे रूग्णालय एक त दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. आयुष विभागाचा एक कक्ष आहे. हे रूग्णालय झाल्यास यात ३० खाटांचा समावेश आहे. कालांतराने खाटांच्या संख्येत वाढ होईल. आयुर्वेदिक रूग्णालयात रूग्णांना आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथीचे दर्जेदार उपचार मिळणार आहेत. सोबत तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील म्हणाल्या, आरोग्य विभागाचा ईमेल नुकताच प्राप्त झाला आहे. रूग्णालय परिसरात असलेल्या एक जागा निश्चित करून तीस खाटांचे रूग्णालय साकारण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. निकषानुसार प्रस्ताव तयार करून तो पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आरोग्य विभाग जागेची पाहणी करून निर्णय घेणार आहे.